डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेचे अर्ज भरण्यास सुरुवात

करिअरनामा ऑनलाईन ।शालेय विद्यार्थ्यांना विज्ञान विषयात आवड निर्माण व्हावी. त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, या उद्देशाने बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळातर्फे दरवर्षी इयत्ता सहावी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेचे आयोजन केले जाते.

Dr. Homi Bhabha Balvaidnyanik Competition Registration

ही स्पर्धा लेखी, प्रात्यक्षिक, कृतीसंशोधन प्रकल्प व विज्ञान विषयक सामान्य ज्ञानावर मुलाखत अशा चार टप्प्यात घेतली जाते. दरवर्षी ही परीक्षा ऑफलाइन होते. मात्र यंदा करोनाच्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. दरवर्षी या स्पर्धेसाठी शाळेमार्फत अर्ज भरले जात होते. यंदा प्रत्यक्ष शाळा बंद असल्यामुळे थेट नावनोंदणीचा पर्यायही खुला करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांनाही नावनोंदणी २८ डिसेंबरपर्यंत करता येणार आहे. सहावीची परीक्षा १७ जानेवारी रोजी तर नववीची परीक्षा २४ जानेवारी रोजी होणार आहे. तर निकाल ३ फेब्रुवारी रोजी जाहीर केला जाणार आहे. नावनोंदणी आणि सविस्तर माहिती पालकांनी www.msta.in या वेबसाइटवर भेट द्यावी, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Dr. Homi Bhabha Balvaidnyanik Competition Registration

अधिकृत वेबसाईट – http://www.msta.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

भाभा अणु संशोधन केंद्रांतर्गत 160 जागांसाठी मेगा भरती

मोठी बातमी: भारतीय रेल्वेत 1 लाख 40 हजार जागांसाठी बंपर भरती

खुशखबर! एक-दोन नव्हे तब्बल चार वेळा होणार JEE Main परीक्षा