District Court Recruitment 2024 : पात्रता फक्त 4 थी पास… जिल्हा सत्र न्यायालयात नोकरी; 47,600 एवढा पगार

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही 4 थी पास असाल आणि (District Court Recruitment 2024) सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. जिल्हा सत्र न्यायालय, अहमदनगर येथे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 एप्रिल 2024 आहे.

संस्था – जिल्हा सत्र न्यायालय, अहमदनगर
भरले जाणारे पद – सफाईगार
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (District Court Recruitment 2024)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 एप्रिल 2024
अर्ज पाठिवण्याचा पत्ता – जिल्हा व सत्र न्यायालय, अहमदनगर, डी.एस.पी. चौक, न्यायनगर, अहमदनगर-४१४ ००१

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. उमेदवार ४ थी उत्तीर्ण असावा आणि प्रकृतीने सुदृढ असावा.
2. उमेदवारास स्वच्छतेबाबतची उपकरणे हाताळण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
वय मर्यादा – (District Court Recruitment 2024)
1. जाहिरात प्रसिध्दीच्या दिवशी शासनाने निर्दिष्ट केल्यानूसार, सर्वसाधारण प्रवर्गाच्या बाबतीत वय १८ वर्षापेक्षा कमी आणि ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे आणि अनुसूचित जाती, अनूसूचित जमाती, इतर मागासवर्ग किंवा विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत ४३ वर्षापेक्षा जास्त नसावे.
2. योग्य मार्गाने अर्ज करणा-या राज्य/केंद्र सरकारी कर्मचा-याच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा लागू असणार नाही.

परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – 15,000/– ते 47,600/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – अहमदनगर (महाराष्ट्र)
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.districts.ecourts.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com