DIAT Recruitment 2022 : प्राध्यापकांसाठी आनंदाची बातमी! पुण्यात ‘या’ कॉलेजमध्ये मिळवा नोकरी; लगेच अर्ज पाठवा

करिअरनामा ऑनलाईन। डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी, पुणे येथे लवकरच काही जागांसाठी (DIAT Recruitment 2022) भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक ही पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी, पुणे (Defence Institute of Advanced Technology, Pune)

भरली जाणारी पदे –

  1. प्राध्यापक (Professor) – 1 पद
  2. सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) – 1 पद
  3. सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) – 3 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (DIAT Recruitment 2022)

  1. वरील पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Ph.D. degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  3. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 10 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रे
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

वय मर्यादा –

  1. प्राध्यापक – 62 वर्षे
  2. सहयोगी प्राध्यापक – 45 वर्षे
  3. सहाय्यक प्राध्यापक – 40 वर्षे

अर्ज करण्यासाठी पत्ता –

उपनिबंधक (प्रशासन), डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (डिम्ड टू बी युनिव्हर्सिटी), गिरीनगर, पुणे (महाराष्ट्र)-411025

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 सप्टेंबर 2022

काही महत्वाच्या लिंक्स – 

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.diat.ac.in/ 

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com