DCPW Recruitment 2024 : समन्वय पोलीस वायरलेस संचालनालय अंतर्गत ‘या’ उमेदवारांना नोकरीची मोठी संधी; जणून घ्या अर्ज प्रक्रिया

करिअरनामा ऑनलाईन । संचालक पोलिस वायरलेस अंतर्गत (DCPW Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. तुमच्यासाठी सरकारी नोकरीची ही उत्तम संधी आहे. भरती जाहीर झाल्यापासून 60 दिवसांच्या आत तुम्ही या पदासाठी अर्ज करु शकता.

या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक विभाग अधिकारी, संपर्क अधिकारी (Cy), संपर्क अधिकारी पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इच्छुक उमेदवारांना या भरतीची अधिसूचना जारी झालेल्या तारखेपासून 60 दिवसापर्यंत म्हणजेच दि. 26 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

संस्था – समन्वय पोलीस वायरलेस संचालनालय (DCPW Recruitment 2024)
भरली जाणारी पदे – सहाय्यक विभाग अधिकारी, संपर्क अधिकारी (Cy), संपर्क अधिकारी
पद संख्या – 13 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 एप्रिल 2024 (अधिसूचना जारी झाल्यापासून 60 दिवसाच्या आत)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहसंचालक (प्रशासन), DCPW” ब्लॉक 9, CGO, कॉम्प्लेक्स, लोध रोड, नवी दिल्ली-110003
वय मर्यादा – 56 वर्षे

भरतीचा तपशील – (DCPW Recruitment 2024)

पदपद संख्या 
सहाय्यक विभाग अधिकारी01
संपर्क अधिकारी (Cy)02
संपर्क अधिकारी10

मिळणारे वेतन –

पदवेतन
सहाय्यक विभाग अधिकारीLevel 7 (Rs.44900-142400)
संपर्क अधिकारी (Cy)Level 7 (Rs.44900-142400)
संपर्क अधिकारीLevel 7 (Rs.44900-142400)

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
3. दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे. (DCPW Recruitment 2024)
4. अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

काही महत्वाच्या लिंक्स – (DCPW Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF 1
PDF 2
अधिकृत वेबसाईट – https://dcpw.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com