कोरोनाची दहशत आहे, पण परीक्षांच्या वेळापत्रकात सध्यातरी बदल नाहीच – शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

करिअरनामा । कोरोनाची दहशत सगळीकडे पसरली आहे. भारतातही त्याचे रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे ८ रुग्ण आढळून आल्यानंतर नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची खबरदारी घेत पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मंगळवारपासून पुणे शहर व जिल्ह्यामध्ये ‘आपत्ती व्यवस्थापन कायदा’ लागू केला. त्यामुळे आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाल्यास खासगी रुग्णालय, डॉक्टर आणि रुग्णालयातील यंत्रसामग्री अधिग्रहित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय अवलंबण्यात येत आहेत. सध्या परीक्षांचा काळ असल्याने विद्यार्थी आणि विशेषत पालकांमध्ये कोरोनामुळे भीतीचे वातावरण आहे. आजारासंदर्भातील भयानकतेमुळे परीक्षा पुढे ढकलण्यात येतील असा अंदाज वर्तविला जात असताना राज्यातल्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल होणार नसल्याचे संकेत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.

“राज्यात निश्चितच कोरोनाामुळे भीतीचे वातावरण आहे. पण तूर्तास शालेय परीक्षा वेळापत्रकात बदल करण्याचा विचार नाही.” असे ट्विट शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”