Civil Service Free Coaching : तुमचं UPSC,MPSC तून सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न होणार साकार!! सरकार देतंय मोफत प्रशिक्षण; 3 जुलैपर्यंत करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । समाजात असे अनेक तरुण आहेत (Civil Service Free Coaching) जे केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देवून IAS किंवा IPS होण्याचं स्वप्न उराशी बाळगतात. काही विद्यार्थ्यांना यामध्ये यश मिळतं तर अनेक विद्यार्थ्यांना अपयशाला सामोरं जावं लागतं. UPSC परीक्षा देवून अधिकारी होवू पाहणाऱ्या तरुणांसाठी ही महत्वाची अपडेट आहे. सरकार तुमच्यासाठी मोफत प्रशिक्षण योजना घेवून आलं आहे. यामुळे तुमच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होणार आहे. याविषयी सविस्तर जाणून घेवूया….

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत (Civil Service Free Coaching) महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच ‘बार्टी’ने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी एक उत्तम संधी निर्माण केली आहे. बार्टीच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी MPSC, UPSC, पोलीस भरती यासाठी मोफत प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जाणार आहे; त्यासाठी बार्टीतर्फे अर्ज मागवण्यात आले आहेत. दि. 3 जुलै 2024 पर्यंत इच्छुक उमेदवारांना यासाठी अर्ज करता येणार आहे.

‘या’ स्पर्धा परीक्षांसाठी मिळणार प्रशिक्षण (Civil Service Free Coaching)
बार्टीतर्फे संघ लोकसेवा आयोग (UPSC), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा, न्यायिक सेवा, अभियांत्रिकी सेवा), पोलीस व मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण, बँक, (IBPS) रेल्वे, एलआयसी व इतर तत्सम स्पर्धा परीक्षांच्या पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज मागवण्यात येत आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

शासन निर्णयानुसार सर्वंकष धोरण निश्चित
स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांच्या अंमलबजावणीकरिता महाराष्ट्र शासनामार्फत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक 30 ऑक्टोबर 2023 च्या शासन निर्णयानुसार सर्वंकष धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने पुण्यातील बार्टीमार्फत सन 2024-25 करिता वरील परीक्षांच्या पूर्व प्रशिक्षणासाठी हे अर्ज मागवण्यात आले आहेत.

अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे खालील पात्रता असणे आवश्यक –
1. उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
2. उमेदवाराकडे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा दाखला व अधिवास असणे गरजेचे आहे.
3. उमेदवाराचे वय वरील परीक्षांच्या अटी व शर्तीनुसार पूर्ण असावे.
4. अनाथ आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराकडे महाराष्ट्र शासानाच्या महिला व बालविकास विभागाकडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. (Civil Service Free Coaching)
5. आर्थिक उत्पन्न 8 लाखांपर्यंत असणाऱ्या उमेदवारालाच यासाठी अर्ज करता येणार आहे.
6. उमेदवार दिव्यांग असल्यास 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्व असल्याच्या प्रमाणापत्राची साक्षांकित प्रत सदार करावी.

आरक्षण खालीलप्रमाणे असेल –
1. महिलांसाठी 30 टक्के आरक्षण असेल.
2. दिव्यांगांसाठी 5 टक्के आरक्षण असेल.
3. वंचित उमेदवारांसाठी 5 टक्के आरक्षण असेल. (वाल्मिकी व तत्सम जाती-लोहार, बेरड, मातंग, मांग, मागदी इत्यादीसाठी)

अशी होणार निवड –
1. या प्रशिक्षणासाठी पात्र ठरायचे असेल तर तुम्हाला एक परीक्षा द्यावी लागेल.
2. सामायिक प्रवेश परीक्षा अर्थात सीईटीत मिळालेल्या गुणांच्या आधारेच या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येईल.
3. इच्छुक उमेदवारांनी http://trtipune.in/bartregmay24/ या लिंकवरुन ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
4. ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 3 जुलै 2024 आहे; त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com