करिअरनामा ऑनलाईन । देशभरात लोकसभा निवडणुकांची (CET Exam 2024) रणधुमाळी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रवेश परीक्षा कक्षाने (CET CELL) पुन्हा एकदा परीक्षांच्या तारखा बदलल्या आहेत. त्यानुसार सीईटी सेलने विधी ५ वर्ष, बी.ए., बी.एस्सी बी.एड यांसह 8 अभ्यासक्रमाच्या तारखांमध्ये बदल केला आहे. पीजीपी-/एम.एससी /एम. एमसी(पी अँड ओ) या सीईटी परीक्षेच्या तारखा नंतर जाहीर केल्या जातील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
अशा आहेत परीक्षेच्या सुधारीत तारखा (CET Exam 2024) –
सीईटी सेलने सुधारित वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले आहे. वास्तुकला अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा १२ मे रोजी होणार आहे. चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा १७ मे रोजी होणार होती ती आता २४ मे रोजी होणार आहे. तसेच एलएलबी (5 वर्षे) अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा १७ मे रोजी (CET Exam 2024) होणार होती ती आता २२ मे रोजी होणार आहे. बी. एस्सी नर्सिंगची सीईटी १८ मे रोजी होणार होती. ती परीक्षा आता २८ मे रोजी होणार आहे. बीएचएमसीटी सीईटीची २२ मे ची परीक्षा आता२४ मे रोजी होणार आहे. तसेच बी.बीसीए/बीबीए/बीएमएस/ बीबीएम-सीईटी परीक्षा २९ मे रोजी, डीपीएन/पीएचएन सीईटी आणि एम प्लॅनिंग सीईटी परीक्षा २५ मे रोजी होणार आहे. सुधारित वेळापत्रकाची माहिती घेऊनच विद्यार्थ्यांनी परीक्षेला उपस्थित राहावे असे आवाहन कक्षाने केले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com