CET Exam 2024-25 : सीईटीच्या तारखा बदलल्या; सुधारित वेळापत्रक जाहीर

SECL Recruitment 2024 (1)
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । एप्रिल आणि मे महिन्यात होत (CET Exam 2024-25) असलेल्या ८ अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या तारखांत बदल करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीईटी सेलने यापूर्वी जाहीर केलेल्या आपल्या अनेक विषयांच्या सीईटी परीक्षेच्या तारखांमध्ये बदल केले आहेत. सुधारित वेळापत्रकही संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.

अशा आहेत परीक्षेच्या नव्या तारखा (CET Exam 2024-25)
यामध्ये पीजीपी-/एम.एससी /एम. एमसी (पी अँड ओ) या सीईटी परीक्षांचा समावेश असून या परीक्षांच्या तारखा नंतर जाहीर केल्या जाणार आहेत. सीईटी सेलने यापूर्वी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार एमएचटी सीईटी यापूर्वी १६ एप्रिल रोजी सुरू होणार होती आणि ३० एप्रिलला संपणार होती. आता ही परीक्षा २२ एप्रिलनंतर होणार आहे. पीसीबी गटाची परीक्षा २२, २३, २४, २८, २९, ३० एप्रिल या तारखांना होणार आहे; तर पीसीएम गटाची परीक्षा २, ३, ४, ५, ९, १०, ११, १५, १६ मे रोजी होणार आहे.
एएसी सीईटीची परीक्षा पूर्वीच्या (CET Exam 2024-25) तारखेला म्हणजे १२ मे रोजीच होईल. बीए/बीएससी, बीएड (४ वर्षांचा इंटिग्रेटेड कोर्स)ची सीईटी २ मे रोजी होणार होती. ती आता १७ मे रोजी होणार आहे. एमएएचएलएलबी ही परीक्षा १७ मे रोजी होईल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com