करिअरनामा ऑनलाईन । राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (CET Cell) घेतल्या जाणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रम परीक्षांच्या उत्तरतालिकांतील (Answer Sheet) प्रश्नोत्तरांवर उमेदवारांना हरकती नोंदवता येणार आहेत. मात्र आता उमेदवारांना प्रत्येक आक्षेप, हरकतीसाठी 1 हजार रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
‘ऑब्जेक्शन ट्रॅकर’ सुविधा विकसित (CET Cell)
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (CET) घेतल्या जातात. या परीक्षांच्या उत्तरतालिकांमधील उत्तरांवर उमेदवारांना हरकत, आक्षेप नोंदवता येतो. त्यासाठी सीईटी सेलने ‘ऑब्जेक्शन ट्रॅकर’ (Objection Tracker) सुविधा विकसित केली आहे. तसेच आक्षेप नोंदवण्यासाठीचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केले आहे. ऑब्जेक्शन ट्रॅकरद्वारे उमेदवारांनी नोंदवलेल्या आक्षेपांची प्रगती तपासता येईल. उमेदवारांना दि. २७ ते ३ एप्रिल या कालावधीत शुल्क भरून प्रश्नोत्तरांसंदर्भात आक्षेप, हरकत नोंदवता येणार आहेत.
एकापेक्षा जास्त घेण्यात आलेल्या परीक्षांचा निकाल समान (Objection Track) गुणानुसार जाहीर केला जाणार आहे. उमेदवाराला मिळालेले मूळ गुण समान गुणांपेक्षा वेगळे असू शकतात. नोंदणीवेळी वापरलेल्या ई-मेलद्वारेच आक्षेप-हरकती नोंदवता येणार असल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे. विद्यार्थी cetcell.mahacet.org या संकेतस्थळावरुन अधिक माहिती घेवू शकतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com