कृषी सीईटी’च्या नावनोंदणीची सुरवात; 7 जुलै पर्यंत अर्जाची मुदत

करियर नामा ऑनलाईन | बारावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या कृषी सीईटीच्या बाबत अनेक संभ्रम होते. चालू शैक्षणिक वर्षांमध्ये सीईटी होईल की नाही, याबाबत अनेक तर्कवितर्क केले जात होते. परंतु, ही सीईटी होणार असून आता या परीक्षेसाठी नाव नोंदणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज भरण्याचे आवाहन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने केले आहे.

विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली नोंदणी प्रक्रिया येत्या सात जुलै पर्यंत चालू राहणार आहे. विलंब शुल्क पकडून ही प्रक्रिया 15 जुलैच्या रात्री 11:59 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सुरू राहणार आहे. यंदा राज्यामध्ये 189 महाविद्यालयांमधील 15,257 जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत. यामध्ये, 38 सरकारी महाविद्यालये असून 151 खाजगी महाविद्यालये आहेत.

चालू शैक्षणिक वर्षांमध्ये कृषी अभ्यासक्रमासाठी प्रवेश हे पूर्णपणे राज्य सामायिक प्रवेश परीक्षेच्या (सीईटी) गुणांवरतीच देण्यात येणार आहे. यापूर्वी प्रवेशासाठी सीईटीचे 70% स्कोअर आणि बारावीचा 30% स्कोअर पकडून प्रवेश निश्चित केला जात होता. परंतु, कृषी अभ्यासक्रमांना व्यवसायिक अभ्यासक्रमाचा दर्जा असल्याने, कृषी अभ्यासक्रमाचे प्रवेश फक्त सीईटीच्या गुणांनी होणार आहेत.

 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com