CBSE RESULT 2022 : मोठी बातमी!! CBSE निकालाबाबत सर्वात मोठी अपडेट; ‘या ‘तारखेला निकाल जाहीर होण्याची शक्यता

करिअरनामा ऑनलाईन । काही दिवसांआधीच महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर (CBSE RESULT 2022) झाला आहे. निकालानंतर प्रवेशाची प्रक्रियाही सुरु झाली आहे. मात्र यानंतर वेळ आहे ती CBSE निकालांची. यंदा CBSE बोर्डाने दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा ही दोन टर्ममध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार नोव्हेंबरमध्ये टर्म 1 परीक्षा तर एप्रिल – मे महिन्यात टर्म 2 परीक्षा पार पडली होती. म्हणूनच आता विद्यार्थ्यांच्या मनात धास्ती वाढू लागली आहे. निकाल कधी लागणार असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडू लागला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE RESULT 2022) जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात 10 वी परीक्षेचा निकाल जाहीर करू शकते, तर 12 वीचा निकाल जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर केला जाईल.

पास होण्यासाठी किमान 30 % गुण आवश्यक – (CBSE RESULT 2022)

CBSE बोर्डाकडून 26 एप्रिल ते 15 जून या कालावधीत 10 वी, 12 वी च्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेसाठी 35 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान 30 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.

असा डाउनलोड करा निकाल –

  1. अधिकृत वेबसाइट- cbse.gov.in OR cbresults.nic.in ला भेट द्या.
  2. यानंतर इयत्ता 10 किंवा 12 च्या निकालाच्या पर्यायावर क्लिक करा.
  3. त्यानंतर नोंदणी क्रमांक / रोल नंबर ऍड करा. (CBSE RESULT 2022)
  4. इयत्ता 10, 12 चा निकाल 2022 स्क्रीनवर दिसेल.
  5. 10वी, 12वी स्कोअरकार्ड डाउनलोड करा
  6. निकालाची किंवा सॉकर कार्डची प्रिंट घेण्यास विसरू नका.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com