करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE Board Result 2024) निकालाची विद्यार्थी आणि पालक आतुरतेने वाट पाहत आहेत. CBSE ने आपल्या cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाईटवर या वर्षीच्या 10वी आणि 12वीच्या निकालाबाबत अधिसूचना जारी केली आहे. हे निकाल दि. 20 मे नंतर जाहीर होऊ शकतात. यावर्षी सुमारे 39 लाख विद्यार्थ्यांनी सीबीएसई बोर्डाची (CBSE Board) परीक्षा दिली आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे निकाल सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in आणि cbse.gov.in वर प्रसिद्ध केले जातील.
उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक गुण (CBSE Board Result 2024)
CBSE बोर्ड निकाल 2024 स्कोअरकार्डमध्ये विद्यार्थ्यांची नावे, रोल नंबर, विषय-विशिष्ट गुण, एकूण ग्रेड आणि इतर माहिती असेल. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी, विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात आणि एकूणच किमान 33% गुण मिळणे आवश्यक आहे.
इथे पहा निकाल –
इयत्ता 10 वी आणि 12 वीचे CBSE बोर्डाची परीक्षा दिलेले (CBSE Board Result 2024) विद्यार्थी त्यांचे निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त digilocker.gov.in, result.gov.in, cbseresults.nic.in आणि result.cbse.nic वर पाहू शकतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com