करिअरनामा ऑनलाईन । दहावी , बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी (CBSE Board Exam Time Table) महत्वाची बातमी आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (CBSE) इयत्ता दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक बोर्डाच्या cbse.gov.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.
CBSEने दि. ४ मार्च रोजी नियोजित केलेला इयत्ता दहावीचा तिबेटी पेपर आता २३ फेब्रुवारीला होणार आहे. तर रिटेल याविषयीचा पेपर १६ फेब्रुवारी ऐवजी आता दि. 28 फेब्रुवारी 202 रोजी होणार आहे. तसेच इयत्ता बारावीची फॅशन स्टडीज विषयाची परीक्षा दि. ११ मार्च ऐवजी दि. २१ मार्च रोजी घेतली जाईल. CBSE च्या इयत्ता दहावीच्या परीक्षा दि. १५ फेब्रुवारी ते दि. १३ मार्च २०२४ या कालावधीत होणार आहेत. तर सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा दि. १५ फेब्रुवारी ते दि. २ एप्रिल २०२४ या कालावधीत होतील. पेपर सकाळी १०.३० वाजता सुरू होणार आहेत.
असं डाउनलोड करा CBSEचे सुधारीत वेळापत्रक (CBSE Board Exam Time Table)
1. www.cbse.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2. होमपेजवर इयत्ता दहावी , बारावीच्या डेट शीट लिंकवर क्लिक करा.
3. डेटशीट स्क्रीनवर दिसेल.
4. परीक्षेचे वेळापत्रक तपासा आणि डाउनलोड करा.
5. पुढील वापरासाठी प्रिंट घ्या.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com