CBSE बोर्डाच्या 10 वी आणि 12 वीच्या निकालाची तारीख अखेर जाहीर

नवी दिल्ली । सीबीएसई बोर्डाच्या (CBSE) इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या निकालाची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक आणि पालकवर्गाला दिलासा मिळाला आहे. येत्या 18 जुलैला 12 वीच्या वर्गाचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तर 10 वी इयत्तेचा निकाल 15 ते 17 जुलैदरम्यान जाहीर करण्यात येणार आहे.

CBSEने दोन्ही वर्गाची निकालासंदर्भातील माहिती वेबसाइट वर अपलोड केली आहे. या अगोदरच 10 वी 12 वीच्या राहिलेल्या विषयांची परिक्षा रद्द करण्याची घोषणा बोर्डाने नुकतीच केली आहे. त्यानंतर लगेच रिझल्ट लावण्यासाठी सीबीएसई बोर्डाने तयारी केली होती. त्यानुसार आता निकालाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली असून 18 जुलै रोजी 12 तर 15 ते 17 जुलै दरम्यान 10 वीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

नोकरी आणि करिअर विषयक माहिती थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – (www.careernama.com)