CBSE 10th Result 2024 : CBSE बोर्डाचा 10 वी चा निकाल जाहीर; पुन्हा मुलींचाच टक्का वाढला

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE 10th Result 2024) आज (13 मे) 10 वी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत देशभरातील एकूण ९३.६० टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. विद्यार्थी सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन रोल नंबर टाकून त्यांचा निकाल पाहू शकतात. 10वीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 13 मार्च या कालावधीत देशभरातील विविध केंद्रांवर घेण्यात आली होती. 12 वी च्या निकालाप्रमाणे 10वीच्या निकालात मुलांपेक्षा मुलींनी चांगली कामगिरी केली आहे. मुलींचा निकाल ९४.७५% लागला आहे; तर एकूण निकाल ९३.६०% असा आहे.

विभागवार निकाल – (CBSE 10th Result 2024)
CBSE 10वी मध्ये देखील त्रिवेंद्रम विभागाचा निकाल सर्वाधिक 99.75 टक्के लागला. यानंतर, विजयवाडा विभागाचा निकाल 99.60%, चेन्नई विभागाचा 99.30%, बेंगळुरू विभागाचा 99.26% आणि अजमेर विभागाचा 97.10% इतका निकाल लागला आहे.

निकाल पाहण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा –
1. सर्वप्रथम CBSEची अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in वर जा.
2. येथे CBSE 10वी निकाल 2024 च्या लिंकवर क्लिक करा.
3. आता रोल नंबर टाका (CBSE 10th Result 2024) आणि सबमिट करा.
4. मार्कशीट तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
5. मार्कशीटची प्रिंट काढा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com