10वी आणि 12वी द्वितीय सत्र परीक्षेचे ऍडमिट कार्ड जाहीर ; करा डॉऊनलोड !

करिअरनामा ऑनलाईन – CBSE द्वितीय सत्र परीक्षेला लवकरच सुरुवात होणार आहे.10वी आणि 12वी द्वितीय सत्र परीक्षेचे ऍडमिट कार्ड जाहीर करण्यात आले आहे.जे विद्यार्थी या परीक्षेसाठी बसणार आहेत त्याना ऍडमिट कार्ड CBSE च्या अधिकृत cbse.gov.in या वेबसाईटवरती मिळतील.

रेग्युलर विद्यार्थ्यांना ऍडमिट कार्ड त्यांच्या विद्यालयाकडूनच download करून मिळणार आहे.स्कुल मधील शिक्षकच CBSE च्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन school code,Id & पासवर्ड टाकून download करून ऍडमिट कार्ड वरती स्वाक्षरी करून देणार आहेत.

तसेच प्रायवेट विद्यार्थ्यांना आपलं ऍडमिट कार्ड स्वतःहून download करायचं आहे.CBSE च्या अधिकृत वेबसाईटवरती लॉग इन ID , Registration नंबर टाकायचा आहे आणि download करायचं आहे.CBSE 10वी & 12वी द्वितीय स्तर बॉर्ड परीक्षेला 26 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे.ही परीक्षा ऑफलाईन होणार आहे.ऍडमिट कार्डशिवाय परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही.

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com