Career Tips : हसा आणि हसवा!! कॉमेडी फील्डमध्ये असं करा करिअर, प्रसिद्धीसह मिळेल भरपूर पैसा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। दिवंगत राजू श्रीवास्तव कॉमेडी (Career Tips) फिल्डमधील एक नावाजलेलं व्यक्तीमत्व होतं. त्यांच्यामुळे विनोद घराघरामध्ये पोहोचला आणि लोकांनाही त्यांची मांडणी खूप आवडली. राजू श्रीवास्तव व्यतिरिक्त भारती सिंह, कपिल शर्मा यांसारखे बरेच लोक आहेत ज्यांनी विनोदात यशस्वी कारकीर्द केली. मराठीमध्ये चला हवा येऊ द्या, महाराष्ट्राची हास्यजत्रा सारखे कार्यक्रम देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहेत.

तुमच्यातील प्रतिभा तुमचं करिअर घडवेल – (Career Tips)

स्टँड-अप कॉमेडी हा एक करिअरचा पर्याय आहे. यासाठी तुम्हाला कोणती प्रवेश परीक्षा, लेखी परीक्षा द्यावी लागत नाही. पण तुमच्याकडील प्रतिभा कौशल्य हेच तुमचे करिअर घडवू शकते. आजकाल देशातील बरेच तरुण आहेत जे स्वत:च्या करिअरबाबत गंभीर आहेत. अनेकांना स्टॅंण्डअप कॉमेडीमध्ये करिअर करायचे आहे पण त्याची सुरुवात कुठून करायची याबद्दल माहिती नसते. या लेखात आपण त्याबद्दल जाणून घेऊया.

एकवेळ रडविणे सोपे असते पण लोकांना हसविणे खूप कठीण असते (Career Tips) असे आपल्याकडे म्हटले जाते. स्टॅंण्डअप कॉमेडी करणाऱ्या व्यक्ती पुढे जाऊन तासन् तास सलग हसवत असतात. आपल्या आजुबाजूला अनेकांकडे हे कौशल्य असते. पण त्यांचा स्वत:वर विश्वास नसल्याने ते मागे राहतात. आपण यातील करिअरविषयी जाणून घेऊया.

व्यक्तीकडे अभिनयाचे अंग असणे गरजेचे आहे. एखादी व्यक्ती अनेकांची मिमिक्री करते त्यांच्या या कौशल्याने त्या समोरच्यांना पोटदुखीपर्यंत हसवू शकतात.

स्वतःची अनोखी शैली असणं महत्वाचं –

प्रत्येक स्टँड-अप कॉमेडियनला स्वतःची एक अनोखी शैली असणे खूप महत्वाचे आहे. जे इतरांच्या गोष्टींची कॉपी करतात ते जास्त काळापर्यंत टिकू शकत नाहीत. तसेच असे (Career Tips) स्टॅण्डअप कॉमेडियन प्रेक्षकांना अजिबात आवडत नाही. त्यामुळे कॉमेडीसोबत स्वत:च्या लेखन आणि कौशल्यांकडे लक्ष द्यायला हवे.

हे करा – (Career Tips)

एखादी व्यक्ती त्याच्या विनोद बुद्धीतून लोकांचे लक्ष कोणत्याही सामाजिक विषयाकडे वळवत असेल किंवा त्यातून सकारात्मक संदेश देत असेल तर तो त्याच्या कारकिर्दिमध्ये सर्वोच्च स्थानी पोहोचू शकतो.

यासाठी विनोदविरांना जुन्या विनोदांतून प्रेरणा घेता आली पाहिजे. (Career Tips)

या फिल्डमध्ये करिअर करु इच्छिणाऱ्यांनी विनोदी शो पाहणे आणि कॉमेडीची चांगली पुस्तके वाचणे गरजेचे आहे.

विनोदातील टायमिंग हा महत्वाचा भाग आहे. हे कौशल्य ज्याला आले तो बाजी मारुन नेतो. त्यामुळे हे कौशल्य आत्मसात करण्याचा प्रयत्न करा.

स्टॅण्डअप कॉमेडी फिल्डमधील दिग्गज कलाकार –

  1. राजू श्रीवास्तव
  2. भारती सिंग
  3. कपिल शर्मा
  4. सुनील ग्रोव्हर
  5. जॉनी लीव्हर (Career Tips)
  6. विजय ईश्वरलाल पवार (व्हीआयपी)
  7. अली असगर
  8. कृष्णा अभिषेक
  9. सुदेश लेहरी
  10. किकू शार्डा

देशातील सर्वात प्रसिद्ध कॉमेडी शो –

  1. चला हवा येवू द्या
  2. महान भारतीय हशा आव्हान
  3. कपिल शर्मा शो
  4. कपिलसह कॉमेडी नाईट्स (Career Tips)
  5. कॉमेडी नाईट्स लाइव्ह
  6. कॉमेडी नाईट्स बचाओ

स्टॅण्डअप कॉमेडी करणाऱ्या व्यक्ती अनेक रिअॅलिटी शोसाठी ऑडिशन देऊ शकतात. अनेक सिनेमांमध्ये चांगली कॉमेडी करणाऱ्यांना मोठी संधी (Career Tips) मिळते. स्वत:चे युट्यूब चॅनल्स काढूनही तुम्ही लाखो फॉलोअर्स मिळवू शकता आणि चांगली कमाई करू शकता. देशात सुरु असलेल्या चुकीच्या घटनांवर सार्क्यास्टिक कॉमेडी करुन देखील खूप सारे फॉलोअर्स मिळविता येतात.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com