करिअरनामा ऑनलाईन । गेल्या काही वर्षांमध्ये घडलेल्या मोठमोठ्या (Career Tips) घटनांमुळे CBI म्हणजेच ‘सेंट्रल इन्वेस्टीगेशन ब्युरो’ ही संस्था चांगलीच चर्चेत राहिली आहे. CBI चे अधिकारी कसे मोठ्या लोकांपर्यंत पोहोचतात आणि कारवाई करतात याबद्दल तरुणाईच्या मनात बरंच आकर्षण पहायला मिळतं. दिल्लीच्या मंत्र्यांच्या घरी छापे पडल्यानंतर CBI ची काम करण्याची पद्धत सामान्य लोकांना समजू लागली आहे. म्हणूनच आपणही एक CBI ऑफिसर व्हावं अशी इच्छा बऱ्याच तरुणांच्या मनात आहे. पण नक्की यासाठी काय शिक्षण असणं गरजेचं आहे याबद्दल अनेकांना माहिती नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला CBI मध्ये नोकरी कशी मिळवावी याबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.
CBI अधिकारी काय करतात? (Career Tips)
देशातील आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांचा समावेश असलेल्या मोठ्या गुन्ह्यांचा तपास सीबीआय अधिकारी करतात. त्यांच्या ऑपरेशनच्या तीन मुख्य क्षेत्रांशी संबंधित गुन्हेगारी गुप्तचर माहिती गोळा करण्यात देखील ते सामील असतात. भ्रष्टाचारविरोधी, आर्थिक गुन्हे आणि विशिष्ट गुन्हेही CBI अधिकारी हाताळतात.
CBI अधिकारी होण्यासाठी आवश्यक पात्रता
- तुमच्याकडे सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही प्रकारची किमान 50% गुणांसह पदवी असणे आवश्यक आहे.
- तुमचे वय 20-30 वर्षांच्या दरम्यान असावे.
- तुम्हाला येथे आरक्षणाचा लाभ मिळू शकतो. (Career Tips)
- तुम्हाला UPSC किंवा SSC सारखी प्रवेश परीक्षा देखील उत्तीर्ण करावी लागेल.
- तसेच तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असले पाहिजे.
- CBI ने वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे भौतिक मापदंड निश्चित केले आहेत.
निवड प्रक्रिया –
भारतात सीबीआय अधिकारी होण्याचे तीन मार्ग आहेत.
1. पहिला मार्ग म्हणजे एसएससी-सीजीएल परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आणि दुसरी यूपीएससीद्वारे. सीबीआयमध्ये गट क ते उपनिरीक्षकापर्यंत सर्व खालच्या विभागातील भरती SSC द्वारे केली जाते. त्यानंतरच्या प्रमोशनद्वारे एसएससी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर तुम्ही सीबीआयमध्ये एसपी होऊ शकता.
2. दुसरा मार्ग म्हणजे तुम्ही UPSC प्रवेश परीक्षा चांगल्या रँकसह उत्तीर्ण केली तर तुम्ही IPS अधिकारी होऊ शकता. नंतर, तुम्ही सीबीआयमध्ये बदली करुन गहेवू शकता. येथे तुमची SSC-CGL च्या विपरीत थेट अधिकारी स्तरावर नियुक्ती केली जाते. (Career Tips)
3. तिसरा मार्ग UPSC द्वारे देखील गाठता येतो. येथे तुम्हाला UPSC द्वारे उपअधीक्षक (DSP) पदासाठी घेतलेल्या परीक्षेला बसावे लागेल. ही परीक्षा उत्तीर्ण करून तुम्ही थेट A ग्रेड CBI अधिकारी होऊ शकता.
इतका मिळतो पगार (पदानुसार) –
- क्राइम असिस्टेंट पीबी-2 रु.9300-34800/- ग्रेड पे-4200/-
- एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर पीबी-3 रु.15600-39100/- ग्रेड पे-6600/-
- ऑफिस सुपरिटेंडेंट पीबी-2 रु.9300-34800/- ग्रेड पे-4600/-
- स्टेनो ग्रेड ‘A’ / Sr. PS पीबी-2 रु.9300-34800/- ग्रेड पे-4800/- (Career Tips)
- स्टेनो ‘B’/प्राइवेट सेक्रेटरी पीबी-2 रु.9300-34800/- ग्रेड पे-4600/-
- पर्सनल असिस्टेंट पीबी-2 रु.9300-34800/-ग्रेड पे-4200/-
- स्टेनो ग्रेड डी / सीनियर क्लर्क स्टेनो पीबी-1 रु.5200-20200/-ग्रेड पे-2400/-
- जूनियर अकाउंट्स ऑफिसर पीबी-2 रु.9300-34800/-ग्रेड पे-4200/-
सीबीआयमध्ये अनेक प्रकारचे अधिकारी असल्याने, त्यांच्या श्रेणींमध्ये फरक आहे, अशा परिस्थितीत सर्वांचे पगार सारखे नसून वेगळे असतात. सुरुवातीच्या पगाराबद्दल बोलायचे झाले तर, सीबीआय (Career Tips) अधिकाऱ्याचे सरासरी मासिक वेतन 40,000 रुपये आहे आणि त्याशिवाय इतर अनेक भत्तेही मिळतात.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com