Career Tips : नोकरी आणि शिक्षण एकत्र करताना ‘या’ टिप्स करा फॉलो

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षणासाठी होणारा खर्च भागवण्यासाठी (Career Tips) अनेक विद्यार्थी स्वावलंबनाचं धोरण अवलंबताना दिसतात. काहीजण जिवन जगण्यासाठी अभ्यास करण्यासोबत नोकरी देखील करतात. काहींना आर्थिक परिस्थितीमुळे नोकरी करणे अनिवार्य असते. तर काहीजण नोकरीसोबत स्पर्धा परीक्षा किंवा इतर परीक्षांची तयारी करत असतात. नोकरी सोबत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी काही टिप्स फॉलो करणे आवश्यक आहे.

1. वेळापत्रक बनवा (Career Tips)

जसे आपण शाळेचे टाइम टेबल बनवले असेल त्याचप्रमाणे आताही वेळेचे विभाजन करणे आवश्यक आहे. हे केले तरच तुम्ही तुमच्या अभ्यासाला वेळ देऊ शकता. यासाठी दिवसभरातील काही तास अभ्यासासाठी काढावे लागतील. असे केल्याने दिवसभरात तुमचा किती वेळ (Career Tips) शिल्लक आहे, ज्याचा तुम्ही अभ्यासासाठी उपयोग करू शकता, हे तुमच्या लक्षात येईल. तसेच या वेळापत्रकात तुम्ही कठीण विषयांसाठी वेळ बाजूला ठेवू शकता.

2. परीक्षेच्या पॅटर्नविषयी माहिती घ्या

तुम्ही कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेचा अभ्यास करत असाल तर त्यासाठी परीक्षेची तयारी करण्यापूर्वी तुम्हाला त्या परीक्षेची पद्धत समजून घ्यावी (Career Tips) लागेल. तसेच, नोकरीसोबत काही तास काढून सुमारे चार ते पाच तास मन लावून तयारी करावी लागेल. जर तुम्ही एखाद्या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी अभ्यास करत असाल तर त्यासाठीही तुम्ही वेळापत्रक बनवा आणि अभ्यासाला सुरुवात करा.

3. सकारात्मक विचार करा (Career Tips)

अभ्यास करताना तुमचे संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केले पाहिजे. असे केल्याने तुमच्या मनात आत्मविश्वासही टिकून राहतो. यासोबतच तुमच्या मनात फक्त सकारात्मक विचार ठेवा. जर तुम्ही जास्त नकारात्मक विचार केलात तर तुमच्या अभ्यासाचाही त्यामुळे खूप त्रास होतो. यासाठी सकारात्मक विचारांनी केलेला अभ्यास चांगला लक्षात राहतो.

4. ऑनलाइन कोचिंग आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळवा 

कामानंतर संध्याकाळी तुम्ही ऑनलाइन कोचिंग करू शकता. याच्या मदतीने तुमच्याकडे नोट्सही असतील आणि तुम्ही ठरलेल्या वेळेत अभ्यास करू शकाल. याशिवाय (Career Tips) वरिष्ठांच्या मदतीने तुम्ही तुमचा अभ्यासही करू शकता. तुम्ही तुमच्या वरिष्ठांकडून मार्गदर्शन देखील घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला अभ्यास करणे सोपे जाईल.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com