Career Tips : सावधान!! तुम्ही Qualified असूनही ‘या’ कारणांमुळे होवू शकता रिजेक्ट

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीचा शोध (Career Tips) घेण्याचा काळ फार त्रासदायक असतो. बऱ्याचदा शिक्षण असूनही तुम्ही नाकारले जाता. तुम्हाला सतत ऐकावं लागतं की, तुमच्या ऐवजी त्या ठिकाणी दुसऱ्या योग्य व्यक्तीला घेण्यात आलं आहे.

पण बऱ्याचदा हे कळत नसतं की, आपल्याकडे गुणवत्ता असूनही वारंवार नकार का येतो? याचं रहस्य तुम्ही नोकरीसाठी इंटरव्युव्ह कसा देतात यामध्ये आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःमध्ये काही बदल केले तर यश नक्कीच मिळू शकते.

क्वालिफाइड आहात पण बोअरींग आहात… (Career Tips)

याचा अर्थ तिथे तुम्हाला कोणाचं मनोरंजन करायचा असा होत नाही. पण नुसती डिग्री असून भागत नाही. नवीन काही शिकण्याची तयारी, उत्सुकता आणि उत्साह तुमच्या उत्तरातून आणि देहबोलीतून जाणवणं गरजेचं आहे. जर तुमचा अ‍ॅटीट्यूड ताठर असेल तर असे लोक स्वीकारले जात नाहीत.

क्वालिफीकेशन आहे पण मुलाखत कौशल्य नाही…

तुमच्याकडे शिक्षण अनुभव असेल पण मुलाखत कौशल्य नसेल तरी तुम्ही नकारले जाता. तुम्ही किती काम केलं किंवा करू शकता त्यापेक्षा ते तुम्ही योग्य वेळ आली की, कसे (Career Tips) मांडता हे आवश्यक आहे. असाच मुद्दा मुलाखतीच्या वेळी येतो. मुलाखतीच्या वेळचं तुमचं बोलणं, वागणं आणि सादरीकरण जर योग्य नसेल तर तुमचा प्रभाव पडत नाही.

क्वालिफाइड आहात पण डेस्परेट असाल तर…

जर तुम्ही मुलाखतीत असं दाखवलं की, तुम्हाला या नोकरीची किती गरज आहे, हा तुमचा ड्रीम जॉब आहे वगैरे तर हे सुध्दा तुमचं इंप्रेशन खराब करू शकतं. या ऐवजी तुम्ही आधीचा (Career Tips) जॉब का सोडलात किंवा सोडत आहात आणि नवीन जॉब का शोधत आहात याची मुद्देसुद खरी कारणं दिलीत तर ते अधिक प्रभावी ठरतं.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com