करिअरनामा ऑनलाईन । फॅशनपासून ते तंत्रज्ञानापर्यंत, महिलांनी (Career Success Story) जवळपास सर्वच क्षेत्रे काबीज केली आहेत. या यशस्वी व्यावसायिक महिलांच्या यादीत उपासना टाकूचेही (Upasana Taku) नाव येते. ‘फिनटेक मार्केट’चे नेतृत्व करणाऱ्या काही महिला उद्योजकांपैकी उपासना ही एक आहे. त्या ‘Mobikwik च्या’ CEO आहेत. त्यांनी आपल्या पतीसोबत ही कंपनी सुरू केली. उपासना इंजिनीअरिंगची विद्यार्थिनी आहे. पंजाब टेक्निकल युनिव्हर्सिटीमधून त्यांनी इंजिनीअरिंगची पदवी मिळवली. यानंतर उपासनाने स्टॅनफोर्ड विद्यापीठातून मॅनेजमेंट सायन्स आणि इंजिनिअरिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले. लाखो महिलांसाठी ती प्रेरणास्थान आहे; यामागचं कारण काय.. जाणून घेवूया…
अमेरिकेतून भारतात परत आली (Career Success Story)
उपासना यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी अमेरिकन पेमेंट फर्म PayPal साठी उत्पादन व्यवस्थापक म्हणून काम केले आहे. त्यांनी एचएसबीसीमध्येही काम केले. त्या आधी अमेरिकेत राहत होत्या. पण नंतर ती 2008 मध्ये भारतात परतली आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला. 17 वर्षांहून अधिक काळ त्यांनी या संबंधित क्षेत्रात काम केले आहे.
व्यवसायासाठी भारत योग्य वाटला पण मायदेशी परत येण्यास कुटुंबीयांचा विरोध
एका मुलाखतीत उपासना म्हणाली होती की, “भारतात जितक्या समस्या आहेत तितक्याच संधी आहेत. या दोन्ही गोष्टींनी भारत परिपूर्ण आहे. मला ज्या प्रकारचा व्यवसाय करायचा होता (Career Success Story) त्यासाठी भारत हे योग्य ठिकाण होते. पण भारतात परतण्याच्या माझ्या योजनेला कुटुंबीयांनी विरोध केला. हा निर्णय जोखमीचा ठरेल असे, कुटुंबातील सदस्यांना वाटत होते. पण मी मागे हटले नाही; रिस्क घेतली.” उपासनाचे आई-वडील आफ्रिकेत राहत होते. वडील इरिट्रियामधील अस्मारा विद्यापीठात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते; तर आई संगीतकार.
NGO साठी योगदान दिलं
2008 मध्ये भारतात परत आल्यानंतर उपासनाने PayPal मधील नोकरी सोडली. तिला तिच्या व्यवसायाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काहीतरी करायचं होतं. उपासनाने आयुष्यात (Career Success Story) सर्व सुखसोयींचा उपभोग घेतला होता. तिच्याकडे मोठं घर, गाडी आणि इतर अनेक सुविधा होत्या. भारतात आल्यानंतर तिने दृष्टी या मायक्रोफायनान्स एनजीओसाठी बिहार आणि उत्तर प्रदेशच्या ग्रामीण भागात काम करण्यास सुरुवात केली.
2008 मध्ये जोडीदाराची भेट झाली (Career Success Story)
उपासना तिचे पती बिपीन प्रीत सिंग यांना एका नाटकाच्या शो दरम्यान पहिल्यांदा भेटली. ते वर्ष होते 2008. नंतर 2011 मध्ये त्यांचे लग्न झाले. 2008 मध्ये MobiKwik ची सह-स्थापना करणाऱ्या सिंह यांनी प्लॅटफॉर्मची संकल्पना विकसित केली. बिपीन आधी करत असलेली नोकरी सोडू शकला नाही कारण कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी त्यांच्यावर होती. उपासनाने त्यांना नोकरी सोडून स्टार्टअप सुरू करण्याचे बळ दिले आणि दोघांनी 2009 मध्ये व्यवसाय सुरू केला.
यशस्वी व्यावसायिक महिलांच्या यादीत उपासना टाकूचे नाव
उपासना टाकूने सुद्धा अशीच काहीसी मेहनत करत यश मिळवले आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर उपासनाने सुमारे १७ वर्षे परदेशात अनेक कंपन्यांमध्ये नोकरी केली. उपासना (Career Success Story) यांचे खूप आधी पासूनचे स्वपन होते की त्यांना एक व्यवसाय करायचा होता आणि त्यादिशेने पाऊल उचलत त्यांनी भारत गाठले. सुरुवातीला उपासना यांच्या या निर्यणायला घरच्यांनाचा पाठिंबा नव्हता तरीसुद्धा त्या निर्णयावर ठाम राहिल्या. आज यशस्वी व्यावसायिक महिलांच्या यादीत उपासना टाकूचे यांचेसुद्धा नाव येते.
कंपनीची उलाढाल सुमारे 8 हजार कोटी
2008 मध्ये भारतात परतल्यानंतर उपासना यांची भेट बिपीनप्रीत सिंगसोबत झाली आणि त्यानंतर काही वर्षातच ते विवाहबद्ध झाले. नंतर २००९ मध्ये दोघांनी एकत्र मिळून व्यवसाय सुरू केला. बिपीनने मोबिक्विक अशी व्यवसाय संकल्पना तयार केली होती, पण ते सुद्धा नोकरी करत असल्याने ही संकल्पना तशीच राहिली होती, त्यानंतर उपासनाने बिपीनप्रीतला सपोर्ट केला आणि दोघांनी मिळून २००९ मध्ये व्यवसाय सुरू केला. मोबिक्विक नावाची छोट्या कंपनीने आज फिनटेक उद्योगात मोठे नाव बनवले आहे. काही अहवालानुसार, कंपनीची उलाढाल सुमारे आठ हजार कोटी रुपये आहे.
उच्च शिक्षण आणि नोकरी (Career Success Story)
उपासना हिने पंजाब टेक्निकल युनिव्हर्सिटीमधून इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले तर त्यानंतर स्टॅनफोर्ड विद्यापीठातून मॅनेजमेंट सायन्स आणि इंजिनिअरिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर पेपल कंपनीत प्रोडक्ट मॅनेजर म्हणून काम केले आहे. तर याशिवाय एचएसबीसी कंपनीतही काम केले आहे. २००८मध्ये उपासना भारतात परतल्या आणि त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याच्या दिशेने पहिले पाऊल उचलले; आणि इथूनपूढे त्यांच्या प्रगतीचा आलेख नेहमी चढताच राहिला.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com