करिअरनामा ऑनलाईन। “एखादी गोष्ट मिळवण्यासाठीची जिद्द आणि वेडेपणा या दोहोंमध्ये अतिशय कमी अंतर (Career Success Story) असते. माझ्यात या दोन्हीपैकी काय आहे, याचा मी अजून शोध घेत आहे’, हे उद्गार आहेत टायलर कोहेन या व्यक्तीचे. आता हा टायलर कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर टायलर कोहेन याने त्याच्या अथक प्रयत्नांनतर ‘गुगल’ (Google) कंपनीत नोकरी मिळवली आहे. तुम्हाला वाटेल त्यात काय मोठं केलं त्याने? जगातील अनेक व्यक्तींना गुगलमध्ये नोकरी मिळते, त्या टायलरला पण मिळाली असेल. तर असं नाही. हे प्रकरण हे एवढं साधं नाहीये. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये राहणारा टायलर, गुगलमध्ये नोकरी मिळावी यासाठी गेल्या 2 वर्षांपासून प्रयत्न करत होता. त्यासाठी त्याने तब्बल 39 वेळा अर्ज केला. मात्र दरवेळी त्याच्या पदरी केवळ निराशाच पडत होती. गुगलने दरवेळेस त्याचे अर्ज रिजेक्ट करत त्याला नोकरी देण्यास नकार दिला. मात्र तरीही टायलरने हार न मानता त्याचे प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर दोन वर्षांनी त्याला त्याच्या प्रयत्नात यश मिळाले आणि गुगलने त्याचा 40 वा अर्ज स्वीकारत त्याला नोकरी दिली आहे.
अर्जांचा स्क्रीनशॉट केला शेअर (Career Success Story)
‘लिंक्डइन’ या साईटवर टायलरने त्याचा अनुभव कथन केला आहे. टायलर कोहेन याने त्याच्या, आतापर्यंतच्या अर्जांचा एक स्क्रीनशॉटच शेअर केला असून आपल्याला 40 व्या प्रयत्नात यश मिळाल्याचे त्यामध्ये नमूद केले आहे. अमेरिकेतील फूड डिलीव्हरी कंपनी डोअरडॅशमध्य नोकरी करणाऱ्या टायलरने 2019 साली सप्टेंबर महिन्यात गुगलमध्ये नोकरीसाठी अर्ज केला. मात्र त्याला अपयश मिळाले. त्यानंतर सतत 2 वर्ष तो नोकरीसाठी अर्ज करत होता आणि ते अर्ज नाकारण्यात येत होते. अखेर त्याचा अर्ज स्वीकारत गुगलने त्याला welcome म्हटले. यामुळे टायलर प्रचंड आनंदात असून ‘लिंक्डइन’वर त्याने स्क्रीनशॉट टाकत पोस्ट केली आहे.
गुगलनेही केलं अभिनंदन
आतापर्यंत 30 हजारांहून अधिकांनी ही पोस्ट लाईक केली असून त्यावर 700 पेक्षा जास्त कॉमेंट्स आल्या आहेत. विशेष म्हणजे गुगलनेही त्याच्या या पोस्टची दखल घेत त्याचे अभिनंदन केले आहे.
आता तुम्ही म्हणाल की आम्ही हे तुम्हाला का सांगत आहोत?? पण त्याचे कारण आहे हा लेख वाचत असणाऱ्या प्रत्येकाचा आत्मविश्वास वाढवणं. तरुण पिढी करिअरच्या मागे धावता धावता थकून जाते. सततच्या अपयशाने तरुण पिढी वैफल्यग्रस्त होते. पण सत्य असे आहे कि तुम्हाला कितीही वेळा अपयशाला सामोरं जावं लागलं तरी धीर न सोडता (Career Success Story) सातत्यानं प्रयत्न करत राहणं शहाणपणाचं ठरतं. कारण तुम्ही करत असलेले प्रयत्न आणि तुमचं ध्येय यामध्ये खूप अंतर आहे असं वाटत असलं तरी एक ना एक दिवस यश तुमच्या हाती येतंच. टायलर कोहेनच्या प्रवासावरून हा बोध घेता येईल हे निश्चित.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com