करिअरनामा ऑनलाईन । शिखर आणि निधी हे दोघे पती-पत्नी; ज्यांनी (Career Success Story) आयुष्यात प्रत्येक वळणावर एकमेकांची साथ दिली. या दोघांनी त्यांच्या मोठ्या पगाराच्या नोकऱ्या सोडल्या आणि स्वतःच्या स्टार्टअपवर काम करण्यास सुरुवात केली आणि यामध्ये यश मिळवलं. पण वाचायला जेवढा सोपा वाटतो तितका यांचा प्रवास सोपा नव्हता. या दोघांनाही सुरुवातीला खूप अडचणींचा सामना करावा लागला तेव्हा कुठे त्यांना त्यांच्या स्टार्टअपमध्ये यशस्वी होता आलं.
आपण पाहतो की, आजकाल देशातील बहुतांश तरुण स्टार्टअपच्या दिशेने झेपावत आहेत. पण काही स्टार्टअप्स जितक्या वेगानं उघडतात तितक्याच वेगानं बंदही होताना दिसतात. पण जर एखाद्याला स्वतःवर पूर्ण विश्वास असेल आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर तुमचा स्टार्टअप नक्कीच यशस्वी होऊ शकतो; यात शंका नाही.
दोघे आहेत उच्च शिक्षित
शिखर वीर सिंह आणि निधी सिंह हे दोघे पती-पत्नी आहेत. निधी आणि शिखर यांची पहिली भेट कुरुक्षेत्र विद्यापीठात बी.टेक चे शिक्षण घेताना झाली. या दोघांनी हरियाणातील एका इंजिनिअरिंग कॉलेजमधून बायोटेक्नॉलॉजीमध्ये बीटेक केलं आहे. यानंतर निधी (Career Success Story) यांनी गुरुग्राममधील एका कॉर्पोरेट हाऊसमध्ये काम करण्यास सुरुवात केली. नंतर शिखर यांनी हैदराबादच्या इन्स्टिट्यूट ऑफ लाईफ सायन्सेसमधून एम.टेक.चं शिक्षण घेतलं. २०१५ मध्ये दोघांनी व्यवसाय करण्याचा विचार केला. यादरम्यान दोघांनीही नोकरी सोडली.
30 लाखाचं पॅकेज सोडलं
यावेळी शिखर वीर सिंग हे बायोकॉनमध्ये प्रिन्सिपल सायंटिस्ट होते तर निधी यांचा पगार वार्षिक ३० लाख रुपये होता. एक वर्षानंतर, २०१६ मध्ये, त्यांनी बंगळुरूमध्ये आपल्या बचतीतून समोसा सिंग नावाचं स्टार्टअप सुरु केला.
नोकरी सोडली.. घरंही विकलं
‘समोसा सिंग’चे संस्थापक शिखर वीर सिंग आणि निधी सिंग यांनीही असंच काहीसं केलं. त्यांनी त्यांच्या मोठ्या पगाराच्या नोकऱ्या सोडल्या आणि स्वतःच्या स्टार्टअपवर काम करण्यास सुरुवात केली.सुरवातीला दोघांनाही खूप अडचणींचा सामना करावा लागला. त्यांना त्यांचं राहतं घरही विकावं लागलं. एवढं करूनही ते आपल्या कल्पनेवर ठाम राहिले. त्याचाच परिणाम म्हणजे आज या व्यवसायातून ते दररोज लाखो रुपयांची कमाई करत आहे. त्यांनी एवढं मोठं यश कसं मिळवलं ते आपण जाणून घेऊ.
‘समोसा सिंग’ सुरू झालं, पण….
‘समोसा सिंग’ सुरू झालं, पण लवकरच त्यांना मोठ्या किचनची गरज भासू लागली. किचनसाठी जागा खरेदी करण्यासाठी त्यांना पैशाची गरज भासू लागली. हे पैसे उभा करण्यासाठी त्यांनी ८० लाख रुपयांना त्यांचं घर विकलं. या पैशातून दोघांनी बेंगळुरु येथे भाड्यानं फॅक्ट्री घेतली. व्यवसाय वाढवण्यासाठी राहतं घर विकून भाड्यानं फॅक्ट्री घेण्याचा निर्णय अगदी योग्य होता. त्यामुळे व्यवसाय अनेक पटींनी वाढला.
आज आहे इतका टर्न ओव्हर
‘समोसा सिंग’ सुरू करताना दोघांनाही अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. पण दोघांची मेहनत फळाला आली. काही दिवस आणि महिन्यांतच त्यांच्या व्यवसाय झपाट्यानं वाढू लागल्या. आज ते दर महिन्याला सुमारे ३० हजार समोसे विकतात. त्यांची वार्षिक उलाढाल ४५ कोटी रुपये आहे. रिपोर्टनुसार, पती-पत्नी दोघे मिळून दररोज जवळरास १२ लाख रुपये कमवत आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com