Career Success Story : “भगवान देता है तो छप्पर फाडके….”; दोन दिवसात मिळाली दोन उच्च पदे अन् रश्मी बनली SDM

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। असं म्हणतात ना; “देनेवाला जब देता (Career Success Story) है तो छप्पर फाड के देता है|”  जौनपूरची रहिवासी असलेल्या रश्मी यादवच्या बाबतीत असंच काही घडलं आहे. आधी ती एक्साईज इन्स्पेक्टर झाली आणि दुसऱ्याच दिवशी जेव्हा UP PCS चा निकाल आला तेव्हा ती SDM झाली होती. वाचूया रश्मी यादवची प्रेरणादायी कहाणी…

यूपी पीसीएस (UP PCS ) 2022 ची टॉपर रश्मी यादव जौनपूरच्या बदलापूर तहसीलमधील सीड गावची रहिवासी आहे. तिने हायस्कूल आणि इंटरमिजिएट शिक्षण हरिहर सिंग पब्लिक स्कूल, जौनपूरमधून पूर्ण केले. यानंतर या भागातील सर्व तरुणांप्रमाणे तिनेही अलाहाबाद विद्यापीठात बीएस्सी (B.SC) अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. प्रयागराजमध्ये तिने तिचे मामा धीरेंद्र यादव यांच्याकडे राहून शिक्षण घेतले.

रश्मीला पहिल्यापासून अधिकारी व्हायचे होते. त्यामुळे तिने पदवीचे शिक्षण पूर्ण करताच नागरी सेवा परीक्षेची पूर्ण तयारी सुरु केली. तीला 2021 मध्ये पहिल्यांदा यश मिळाले. मात्र कमी रॅंकमुळे ती एसडीएम होऊ शकली नाही. तिची उत्पादन शुल्क निरीक्षक पदासाठी निवड झाली.

रश्मी उत्पादन शुल्क निरीक्षक पदावर रुजू झाल्यानंतर (Career Success Story) अवघ्या दोन दिवसांनी दुसरा निकाल हाती आला. यामध्ये रश्मी यादवला अभूतपूर्व यश मिळाले. UP PCS 2022 मध्ये तिने 26 वा क्रमांक मिळवला होता. अशाप्रकारे एसडीएम बनून तिने आई-वडिलांसह संपूर्ण कुटुंबाचा मान वाढवला.

रश्मी यादव एका शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे. तिचे वडील हरिश्चंद्र यादव हे शेती करतात. तिची आई नर्सची नोकरी करते. तिचा मोठा भाऊ नवनीत आणि धाकटा भाऊ अवनीश हे देखील प्रयागराजमध्ये सरकारी परीक्षेची तयारी करत आहेत. एका सामान्य शेतकरी कुटुंबात वाढलेल्या रश्मी यादवची दुहेरी यशोगाथा हजारो तरुणांना प्रेरणा देणारी आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com