Career Success Story : शिक्षण 12 वी.. कॉलेजला गेलेच नाहीत.. घर गहाण ठेवलं.. उभारली देशातील नंबर वन कंपनी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । घरची बेताची परिस्थिती, अपुऱ्या सोई सुविधा (Career Success Story) यामुळे अनेकांना प्रबळ इच्छा असूनही उच्च शिक्षण घेता येत नाही. अनेक जण शिक्षण अर्ध्यावर सोडून कमाईचा काहीतरी मार्ग निवडतात आणि संसाराचा गाडा ओढतात. संसाराच्या मागे धावता धावता अनेकांना आपल्या स्वप्नांना तिलांजली द्यावी लागते. पण अशातही काही जण गप्प बसत नाहीत. समाजात असेही अनेक लोक आहेत जे आहे त्या परिस्थितीशी सामना करून मोठी झेप घेतात आणि सर्वांसाठी आदर्श ठरतात. आज आपण अशाच एका व्यक्ती विषयी जाणून घेणार आहोत जे कधीही कॉलेजला गेले नाहीत. शिक्षण त्यांच्या प्रगतीच्या आड आले नाही. तरीही त्यांनी आज आपल्या कंपनीच्या माध्यमातून तब्बल 16 हजार जणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

‘अकुम्स ड्रग्स अँड फार्मास्यूटिकल्स’ या देशातील आघाडीच्या औषधनिर्माण कंपनीच्या स्थापनेमागे मोठा इतिहास आहे. या कंपनीचे संस्थापक मालक संजीव जैन आणि संदीप जैन (Career Success Story) या दोन भावांनी छोट्या औषधाच्या दुकानापासून सुरुवात करत आज मोठी कंपनी उभारली आहे. इतकेच नाही तर त्यांनी आपल्या औषधनिर्माण कंपनीच्या माध्यमातून १६ हजार जणांना रोजगार देखील मिळवून दिला आहे.

उभारली देशातील सर्वात मोठी औषधनिर्माण कंपनी
संजीव जैन आणि संदीप जैन असं या दोघा भावंडांचं नाव आहे. ते देशातील आघाडीची औषधनिर्माण कंपनी ‘अकुम्स ड्रग्स अँड फार्मास्यूटिकल्स’ या कंपनीचे मालक आहेत. तीन दशकांपूर्वी संजीव जैन आणि संदीप जैन हे भावंड आपल्या कुटुंबियांसोबत दिल्ली येथे भाड्याच्या घरात राहत होते. मात्र, आजच्या घडीला त्यांची कंपनी ‘अकुम्स ड्रग्स अँड फार्मास्यूटिकल्स’ ही देशातील सर्वात मोठी औषधनिर्माण कंपनी बनली आहे.

अशी झाली व्यवसायाला सुरुवात (Career Success Story)
संजीव जैन आणि संदीप जैन यांचे वडील 1961 साली रोहतक येथून दिल्लीला राहण्यासाठी आले होते. दोघा भावांनी 12 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. सुरवातीला त्यांनी छोटे औषधांचे दुकान सुरू केले. विशेष म्हणजे दोघाही भावांना या व्यवसायात मोठे यश मिळाले. याच दुकानाच्या जोरावर 1991 मध्ये दोघा भावांनी दिल्लीत स्वतःचे घर घेतले. व्यवसायात प्रगती होत होती. त्यांच्या मनात आता दुकानाऐवजी औषधनिर्माण कंपनी सुरु करण्याचा विचार मनात आला. त्यांनी व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने अभ्यास केला आणि 2004 मध्ये पहिली कंपनी सुरू केली.

गुंतवणुकीसाठी घर गहाण ठेवलं
संजीव जैन आणि संदीप जैन यांनी हरिद्वार येथे आपली पहिली औषधनिर्माण कंपनी सुरु केली. विशेष म्हणजे त्याकाळी हरिद्वार परिसरात विशेष सोई सुविधा देखील नव्हत्या. या दोन भवांनी (Career Success Story) हिम्मत दाखवत केवळ 1.17 लाख रुपये गुंतवणुकीतून कंपनी उभी केली. हे पैसे जमवताना त्यांना आपले घर बँकेकडे गहाण ठेवावे लागले होते. या दोघांनी कधी मागे वळून पाहिले नाही. आज त्यांच्या एकूण १५ कंपन्या आहेत. ज्यामध्ये १२ कंपन्या या औषध निर्मिती करतात तर तीन कंपन्या या सक्रिय फार्मा घटक अर्थात एपीआयमध्ये कार्यरत आहेत.

16 हजार लोकांना दिली नोकरी (Career Success Story)
संदीप जैन आपल्या व्यवसायाविषयी सांगतात, की सध्याच्या घडीला ‘अकुम्स ड्रग्स अँड फार्मास्यूटिकल्स’ ही देशातील सर्वात मोठी फार्मास्युटिकल्स कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग संस्था आहे. इतकेच नाही तर स्वित्झर्लंडचा लोन्झा ग्रुपची एकच कंपनी या क्षेत्रात जगात अधिराज्य गाजवत आहे. त्यानंतर ‘अकुम्स ड्रग्स अँड फार्मास्यूटिकल्स’ कंपनी जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. आजमितीला जैन यांच्या कंपनीमध्ये एकूण 16,000 लोक काम करत आहे. त्यापैकी 7,000 पर्मनंट कर्मचारी आहेत तर 9,000 कर्मचारी आउट सोर्स आहेत.

कंपनी करते 18 हजार प्रकारच्या औषधांवर काम
संजीव जैन आणि संदीप जैन यांच्या सर्व कारखान्यात गोळ्या, कॅप्सूलपासून (Career Success Story) इंजेक्शन, कुपी, ट्यूब मलम इत्यादी सर्व काही वस्तु तयार होतात. जैन बंधू सांगतात, सध्या त्यांचे कारखाने 18,000 प्रकारच्या औषधांवर काम करत आहेत. याशिवाय त्यांच्या ग्राहकांची संख्या 1500 इतकी आहे. याशिवाय देशातील टॉप 30 फार्मास्युटिकल कंपन्यांपैकी 26 कंपन्या या ‘अकुम्स ड्रग्स अँड फार्मास्यूटिकल्स’ कंपनीच्या ग्राहक आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com