करिअरनामा ऑनलाईन । तुम्हाला माहीतच आहे; UPSC परीक्षा (Career Success Story) ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो मुलं या परीक्षेची तयारी करतात, परीक्षेला बसतात, पण मोजकीच मुलं यामध्ये यश मिळवतात. IAS अधिकारी होणं ही सोपी गोष्ट नाही. इथपर्यंत पोहचण्यासाठी लोक रात्रीचा दिवस करुन अभ्यास करतात. काहीजण तर मेडिकल, इंजिनिअरिंग, मोठ्या पदाच्या खासगी नोकऱ्या सोडून UPSC परीक्षेची तयारी करतात, पण आज आम्ही तुम्हाला एका अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, त्यांनी IAS ऑफिसरची नोकरी सोडून खाजगी नोकरीचा मार्ग निवडला आहे. वकचुन आश्चर्य वाटतंय ना… पण ही गोष्ट खरी आहे. कोण आहे ही व्यक्ती हे जाणून घेण्यासाठी पुढे नक्की वाचा…
हे आहेत रोहित मोदी?
लोक खाजगी नोकऱ्या सोडून सरकारी नोकऱ्यांचे स्वप्न पाहतात, तर रोहित मोदी यांनी 14 वर्षे IAS अधिकारी म्हणून काम केल्यानंतर या सर्वोच्च पदाचा राजीनामा दिला. त्यांनी 14 वर्षे कलेक्टर म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी काम केले, पण नंतर सरकारी नोकरी सोडून खाजगी नोकरी करण्याचा त्यांनी निर्णय (Career Success Story) घेतला. 1985 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले रोहित मोदी यांनी या नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर अनेक खासगी कंपन्यांमध्ये काम केले. त्यांनी L&T, IDPL, Suzlon Energy, Gammon India आणि Essel Infra Limited मध्ये CEO म्हणून काम केले आहे.
दिल्लीत पूर्ण केले शिक्षण (Career Success Story)
रोहित मोदी यांचे सुरुवातीचे शिक्षण जयपूर, राजस्थान येथे झाले. दिल्लीच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून अर्थशास्त्रात पदवी घेतली. कॉलेज संपल्यानंतर त्यांनी UPSC सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी सुरू केली. १९८५ मध्ये त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी म्हणून निवड झाली. १४ वर्षे ते शहरी विकासात तर कधी कापड, उद्योग, वित्त, कोळसा अशा क्षेत्रात काम करायचे. सर्व काही ठीक चालले होते, पण एके दिवशी अचानक त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. १९९९ मध्ये त्यांनी IAS पदाचा राजीनामा दिला.
कुटुंब झाले हैराण
सरकारी नोकरी सोडण्याच्या निर्णयाने त्यांचे कुटुंब आणि मित्र दोघेही हैराण झाले, पण रोहित खचले नाहीत. त्यांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर आघाडीच्या खाजगी कंपन्यांमध्ये उच्च पदावर काम केले. यामध्ये सुझलॉन एनर्जी, महिंद्रा इंडस्ट्रियल पार्क, L&T IDPL, तामिळनाडू रोड डेव्हलपमेंट (Career Success Story) कंपनी, गॅमन इंडिया, राजस्थानची रोड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनी, एस्सेल इन्फ्रा प्रोजेक्ट्स आणि स्मार्ट युटिलिटीज या कंपन्यांचा समावेश आहे. खासगी क्षेत्रातही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. ते मोठ्या कंपन्यांचे CEO राहिले आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com