Career Success Story : आई-वडिलांना गमावलं; आजीनं शिकवलं… बनली IPS; पती आहेत IAS

करिअरनामा ऑनलाईन । जीवनात एक यशस्वी आणि (Career Success Story) समाजासाठी प्रेरणादायी व्यक्ती बनण्यासाठी काहीवेळा एखाद्याला अगदी कमी वयातच वाईट परिस्थितीचा अनुभव घ्यावा लागतो. अंशिका जैन ही (IPS Anshika Jain) विलक्षण इच्छाशक्ती आणि दृढनिश्चय असलेली अशीच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. अंशिका जैनची ही कहाणी आहे. अंशिका अगदी लहान होती तेव्हाच तिचे आई-वडील हे जग सोडून गेले. आई वडिलांच्या आधारा शिवायच ती मोठी झाली. लहानपणापासून तिला तिच्या आजीने सांभाळले. पुढे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने UPSC परीक्षेची तयारी सुरु केली. अभ्यास सुरु असताना दुर्दैवाने तिच्या आजीचेही निधन झाले. एवढ्या कठीण प्रसंगातून जात असतानाही अंशिका जैन हिने पाहिलेले स्वप्न पूर्ण केलेच. या प्रवासात तिला तिचा जीवनसाथीदार आयएएस वासू जैन (IAS Vasu Jain) यांनी खूप साथ दिली. थोडक्यात जाणून घेवूया IPS अंशिकाच्या जीवन प्रवासा विषयी…

अवघ्या ५ व्या वर्षी पालकांना गमावले
काही लोकांच्या आयुष्यात संघर्ष लहानपणापासूनच सुरू होतो. UPSC निकाल 2022 च्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवणाऱ्या अंशिका जैनची संघर्षकथा कोणालाही प्रेरित करू शकते. अंशिका मूळची दिल्लीची आहे. आयुष्यात आलेल्या प्रतिकूल परिस्थितीसमोर तिने कधीही हार मानली नाही. अंशिकाने (Career Success Story) वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षी आई-वडील गमावले. तेव्हापासून तिचे संगोपन आजी आणि काकांनी केले. शेवटी UPSC (UPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊन तिने आपले स्वप्न पूर्ण केले. या संपूर्ण प्रवासात तिची आजी आणि काका तसेच तिचे होणारे पती वासू जैन यांनी तिला पूर्ण साथ दिली.

UPSC करण्यासाठी नोकरी सोडली (Career Success Story)
अंकिताने दिल्ली विद्यापीठाच्या रामजस कॉलेजमधून बी. कॉमचे शिक्षण घेतले. यासोबतच तिने एम.कॉम. करत असताना यूपीएससीची तयारी सुरू केली. तिच्या पदवी स्तरावरील अभ्यासानंतर, तिने देशातील सर्वात मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांपैकी एकामध्ये चांगली नोकरी मिळवली, परंतु नंतर तिने ही नोकरी नाकारली आणि CSE परीक्षेची तयारी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.

दुर्दैवाने आजीही सोडून गेली
2019 मध्ये UPSC परीक्षेची तयारी करत असताना अंशिकाच्या आजीचेही निधन झाले. मग तिच्या काकांनी तिला पुढे जाण्यास मदत केली. UPSC परीक्षेच्या एका प्रयत्नात फक्त 1 मार्कने तिला (Career Success Story) अपयशाचा सामना करावा लागला होता. तिचे होणारे पती वासू जैन 2021 च्या बॅचचा IAS अधिकारी आहे. त्यांनी UPSC 2020 परीक्षेत 67 वा क्रमांक मिळवला होता. वासूने इंस्टाग्राम आणि ट्विटरवर अंशिकाची यशोगाथा शेअर केली आहे. अंशिका जैन हिने UPSC परीक्षा 2022 मध्ये 306 वा क्रमांक मिळवला आहे. परीक्षेचा तिचा हा ५वा प्रयत्न होता.

नागरी सेवेत रुजू होण्याचं स्वप्न पूर्ण
वासू जैन आणि अंशिका जैन यांचा 25 जून 2023 रोजी प्रेम विवाह झाला आहे. वासू सांगतात की, लग्नाआधीच यूपीएससी मधील यशाने दोघांनाही एक अप्रतिम भेट दिली आहे. अंशिकाने ईडब्ल्यूएस श्रेणीतून यूपीएससीची परीक्षा दिली होती. तिच्या रँकनुसार तिला आयएएस पद मिळाले नाही पण आयपीएस अधिकारी होवून नागरी सेवांमध्ये रुजू होण्याचे तिचं स्वप्न पूर्ण झालं आहे.

सेल्फ स्टडीच्या जोरावर पास केली UPSC
अंशिका सेल्फ स्टडीवर अवलंबून होती. पहिल्या चार प्रयत्नांत (Career Success Story) ती परीक्षा उत्तीर्ण होऊ शकली नाही. अखेरीस, तिच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि तिने पाचव्या प्रयत्नात UPSC CSE 2022 मध्ये AIR-306 मिळवला आणि ती भारतीय पोलीस सेवेत (IPS) अधिकारी बनली. एका मुलाखतीत अंशिका म्हणाली, “मी प्रत्येक विषयाच्या छोट्या नोट्स बनवल्या कारण मला समजले होते की UPSC CSE क्रॅक करण्यासाठी उजळणी करणे खूप महत्वाचे आहे. मी वाणिज्य आणि अकाउंटन्सीला पर्यायी विषय म्हणून निवडले कारण मला या विषयांमध्ये रस होता आणि मला या विषयांची मूलभूत कल्पना देखील होती.”
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com