Career Success Story : MBBS चं शिक्षण अर्ध्यातच सोडलं; नशिबाने यू टर्न घेतला आणि ती बनली UPSC टॉपर 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । तिसरीत शिकत असल्यापासून (Career Success Story) तिला डॉक्टर व्हायचं होतं. पुढे सायन्स मधून तिने शिक्षण घेतलं. नंतर MBBS ला प्रवेश घेतला. मात्र तब्येतीच्या तक्रारीमुळे तिला MBBSचे शिक्षण दुसऱ्याच वर्षात सोडावे लागले. तरीही ती खचली नाही. तिने करिअरचा दुसरा मार्ग शोधला आणि UPSC परीक्षेची तयारी सुरु केली आणि अवघ्या 4 महिन्यात तयारी करुन ती उच्च पदावर अधिकारी झाली. ही कहाणी आहे तरुणी पांडे या तरुणीची. हा लेख वाचल्यानंतर आयुष्यात पुढे जाण्यासाठी तुम्हाला निश्चित प्रोत्साहन मिळेल.

लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत भरघोस कामगिरी
UPSC परीक्षेची तयारी करण्यासाठी लाखो उमेदवार रात्रंदिवस अभ्यास करतात आणि कोचिंग क्लासचीही मदत घेतात. मात्र काही लोक सेल्फ स्टडीच्या जोरावर अतुलनीय यश मिळवतात. यापैकीच एक आहे तरुणी पांडे; जीने लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यासाठी अवघ्या चार महिन्यात तयारी केली आणि या परिक्षेत संपूर्ण भारतातून चौथा क्रमांक पटकावला. या अतुलनीय कामगिरीने ती UPSC टॉपर ठरली आहे.

इंग्रजी साहित्यात घेतली पदवी (Career Success Story)
तरुणी पांडे हिचा जन्म चित्तरंजन, पश्चिम बंगाल येथे झाला. त्यानंतर तिने झारखंडच्या जामतारा येथून शिक्षण पूर्ण केले. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून तिने इंग्रजी साहित्यात पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.
भावाच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर तरुणी पांडेला तिच्या बहिणीसोबत विविध सरकारी कार्यालयांमध्ये जावे लागले. जिथे ती अनेक नोकरशहा आणि राजकारण्यांना भेटली. या काळात तिने आपल्या आयुष्यासाठी आणि करिअरसाठी एक नवीन मार्ग शोधला. या गर्दीच्या वेळी एक माणूस सुद्धा व्यवस्थेत मोठे बदल करू शकतो हे तिच्या लक्षात आले.

शेवटचीच संधी हातात होती
यानंतर तरुणी पांडेने सरकारी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. तिला 2020 मध्ये पहिल्यांदा UPSC च्या पूर्व परीक्षेस  बसायचे होते पण पेपरच्या अवघ्या चार दिवस आधी तिला कोरोनाची लागण झाली. ही संधी हुकली पण यानंतर तिने 2021 मध्ये फॉर्म भरुन परीक्षा दिली. खरे तर ही तिच्यासाठी शेवटची संधी होती. ती सामान्य श्रेणीतून आली आहे आणि 2022 मध्ये तिची परीक्षेसाठी आवश्यक वयमर्यादा संपत असल्याने ती अपात्र ठरली असती. म्हणूनच तिला या शेवटच्या संधीचं सोनं करायचं होतं.

केवळ सेल्फ स्टडी करुन बनली IAS
तरुणी हिने UPSC परीक्षेसाठी कसून अभ्यास केला आणि तिला तिच्या कष्टाचे फळ मिळाले. चार महिन्यांच्या अभ्यासातून तिने हे यश मिळवले आहे. या परीक्षेच्या तयारीसाठी तिने (Career Success Story) यूट्यूबसारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मची मदत घेतली. कोणत्याही कोचिंग क्लास शिवाय तिने केवळ सेल्फ स्टडी केला. आत्मविश्वासाने पेपर लिहल्यामुळे तिला या परीक्षेत संपूर्ण भारतातून 4 था क्रमांक मिळाला आहे. या परिक्षेत ती अव्वल ठरली आहे; आणि IAS पदावर विराजमान झाली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com