Career Success Story :16 व्या वर्षी ऐकू येणं झालं बंद; तरीही क्रॅक केली UPSC; 9 वी रँक मिळवत सौम्या बनली IAS Topper

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । आज आम्ही तुम्हाला एका महिलेची कहाणी (Career Success Story) सांगणार आहोत जिने आपल्या पहिल्याच प्रयत्नात UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली, जी देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. या महिलेचा प्रवास कसा होता आणि त्यांनी अभ्यासासाठी कोणती रणनीती अवलंबली हे जाणून घेऊया…
दिल्लीची रहिवासी सौम्या
सौम्या शर्मा ही दिल्लीची रहिवासी आहे. त्यांनी आपले शालेय शिक्षण पश्चिम विहार येथील दून पब्लिक स्कूलमधून पूर्ण केले आहे. यानंतर त्यांनी कायद्याच्या प्रवेशासाठी NLU म्हणजेच राष्ट्रीय कायदा विद्यापीठात प्रवेश घेतला होता.

 

Career Success Story Saumya Sharma IAS

ऐकण्याची क्षमता गमावली (Career Success Story)
सौम्या 11वीत शिकत असताना त्यांनी श्रवणशक्ती गमावली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना त्यांची खूप काळजी वाटू लागली.  पण सौम्या आपल्या शारीरिक दुर्बलतेमुळे कमजोर पडल्या नाहीत. त्यांनी आपल्याला जे हवं ते साध्य करण्याचं ठरवलं.  त्यांनी ऐकू न येण्याच्या समस्येवर श्रवणयंत्राने उपाय शोधला आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल सुरु ठेवली.

Career Success Story Saumya Sharma IAS

कायद्याचा अभ्यास करताना UPSC देण्याचा घेतला निर्णय
कायद्याचे शिक्षण घेत असतानाच सौम्याने UPSC सिव्हिल सर्व्हिसेस (Career Success Story) परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. कायद्याचे शिक्षण पूर्ण करताच त्यांनी आपले लक्ष UPSC परीक्षा उत्तीर्ण करण्यावर केंद्रित केले.

Career Success Story Saumya Sharma IAS

दररोज 6 ते 8 तास अभ्यास आणि पहिल्याच प्रयत्नात यश
सौम्याने आता नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू केले होते. ठराविक वेळापत्रक बनवून त्यांनी दररोज 6 ते 8 तास अभ्यास सुरु केला. अखेर सौम्या यांना (Career Success Story) त्यांच्या मेहनतीचं फळ मिळालं. UPSC नागरी सेवा परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात त्यांनी चमकदार कामगिरी केली. या परीक्षेत त्यांनी संपूर्ण भारतातून नववा क्रमांक पटकावला आहे.

 

Career Success Story Saumya Sharma IAS

IAS सौम्या शर्मा ही खरी प्रेरणा
UPSC नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या इच्छुकांसाठी IAS सौम्या शर्मा ही खरी प्रेरणा आहे. IAS सौम्या शर्मा यांची वयाच्या 16 व्या वर्षी श्रवणशक्ती कमी झाली होती, पण त्यांनी IAS होण्याचे स्वप्न सोडले नाही. शालेय शिक्षणानंतर सौम्याने कायद्याचा अभ्यास करण्यासाठी नॅशनल लॉ स्कूलमध्ये प्रवेश घेतला आणि 2017 मध्ये UPSC परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला. सौम्याने या परीक्षेसाठी खूप मेहनत घेतली आणि कोणत्याही कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात त्यांना हे यश मिळालं आहे.

Career Success Story Saumya Sharma IAS

UPSC देणाऱ्यांना सल्ला
UPSC परीक्षा देण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना सल्ला देताना सौम्या सांगतात की; “उमेदवारांनी दररोज लिखानाचा सराव ठेवावा. तसेच वर्तमानपत्र वाचावे. केवळ प्रिलिम्ससाठीच नव्हे तर मुख्य परीक्षेसाठीही एकत्र तयारी करा. UPSC टॉपर्सच्या मुलाखती ऐकून त्यानुसार रणनिती तयार करणं नेहमीच फायद्याचं ठरतं.”

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com