करिअरनामा ऑनलाईन । बुद्धिमान व्यक्ती त्यांच्या ध्येयापर्यंत (Career Success Story) पोहोचल्यानंतरच शांत बसतात. काही लोक इतके प्रतिभावान असतात की आयुष्यात मोठं यश मिळवणं ही त्यांची सवय बनते. आम्ही तुम्हाला अशाच एका होतकरु व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, जीने आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर उत्कृष्ट कामगिरी करुन दाखवली आहे. ही गोष्ट तुमच्यासाठी नक्कीच प्रेरणा देणारी ठरेल.
रिझर्व्ह बँकेत केली नोकरी
निधी चौधरी या महाराष्ट्र केडरच्या 2012 बॅचच्या IAS अधिकारी आहेत. त्या महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. निधी नेहमीच अभ्यासात अव्वल राहिल्या आहेत. त्यांचे शालेय शिक्षण हिंदी माध्यम शाळेतून पूर्ण झाले आहे. त्यानंतर त्यांनी बी.ए.मधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी पदवीचे शिक्षण घेत असताना कॉलेजमध्येही टॉप केले होते. त्यानंतर त्यांनी लोक प्रशासन आणि ग्रामविकास या विषयात एम. ए. ची पदवीही मिळवली. त्यांनी आरबीआय ग्रेड बी परीक्षा देखील उत्तीर्ण केली आहे आणि काही काळ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये व्यवस्थापक म्हणून काम केले आहे.
बहिणीकडून मिळाली प्रेरणा (Career Success Story)
रिझर्व्ह बँकेत नोकरी करत असताना निधी यांचे लग्न झाले. त्यांचा संसार सुरु होता. यावेळी त्यांच्या आयुष्यात एक मोठा टर्निंग पॉइंट आला जेव्हा त्यांची बहीण निधी चौधरी आयपीएस (IPS) अधिकारी झाली. 2008 साली UPSC ने घेतलेल्या परिक्षेत तिने 285 वा क्रमांक मिळवला होता. बहिणीकडून प्रेरणा घेवून निधी यांनी UPSC परीक्षा देण्याचे ठरवले.
नोकरी सोडून केला अभ्यास
निधी यांनी आरबीआयची नोकरी सोडली आणि अभ्यास सुरु केला. अभ्यासात त्या पहिल्यापासूनच हुशार असल्यामुळे त्यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSC पास केली. 2010 मध्ये घेण्यात आलेल्या UPSC परीक्षेत त्यांनी संपूर्ण भारतातून 678 वा क्रमांक मिळवला आणि IAS पद मिळवले होते.
IAS होण्यासाठी पुन्हा परीक्षा दिली
निधी यांनी UPSC परीक्षा दिली होती. पहिल्याच प्रयत्नात (Career Success Story) त्या पासही झाल्या आणि त्यांना IPS पद मिळालं. पण त्यांना IAS अधिकारी व्हायचं होतं यासाठी त्यांनी पुन्हा परीक्षेचा फॉर्म भरला. दुसऱ्या प्रयत्नातही त्यांनी बाजी मारली. यावेळी त्यांनी संपूर्ण भारतातून 145 वा क्रमांक मिळवूला आणि त्या IAS अधिकारी झाल्या. आयएएस पदावर काम करताना त्यांनी महाराष्ट्रातील रायगड, मुंबई उपनगरातील जिल्हाधिकारी यासह राज्य सरकारमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com