करिअरनामा ऑनलाईन । UPSC असो किंवा MPSC.. यामध्ये यश (Career Success Story) मिळवण्यासाठी बाहेरून कोचिंग घेणे खूप महत्वाचे आहे असे अनेक उमेदवारांचे मत आहे. असे असले तरी या समजूतिला फाटा देत दरवर्षी अनेक उमेदवार कोचिंग न घेता सुद्धा केवळ सेल्फ स्टडी करुन लाखो उमेदवारासमोर नवीन आदर्श निर्माण करतात. आज आपण नागार्जुन बी गौडाबद्दल (IAS Nagarjun B Gowda) जाणून घेणार आहोत; ज्यांनी खूप संघर्षानंतर आयुष्यात यश मिळवले आहे. ते आधी डॉक्टर आणि नंतर IAS अधिकारी बनले आहेत. समोर उभ्या असलेल्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी नोकरी करत असताना यूपीएससीची (UPSC) तयारी केली. कठोर परिश्रमामुळे ते दुसऱ्याच प्रयत्नात या परिक्षेत यशस्वी झाले आहेत.
कमी पैसा आणि अपुऱ्या सोयी सुविधा
नागार्जुन बी गौडा यांचा जन्म ९ मे १९९२ रोजी कर्नाटकातील एका छोट्या गावात झाला. त्यांना गावातील लोक अर्जुन गौडा या नावाने ओळखतात. त्यांचं शिक्षण गावातीलच शाळेत (Career Success Story) झालं आहे. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती फारशी बरी नव्हती. पैसा आणि इतर सुविधांची कमतरता सतत भेडसावत होती. असे असतानाही त्यांनी या गोष्टीचा अभ्यासावर परिणाम होऊ दिला नाही.
कठोर मेहनतीने मिळवली MBBS पदवी (Career Success Story)
आर्थिक अडचणींचा सामना करत नागार्जुन यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले, पुढे 12 वी पास केली. यानंतर नागार्जुनने मेडिकलची प्रवेश परीक्षा दिली. मेडिकलला प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी स्वतःला अभ्यासात झोकून दिले आणि MBBS ची पदवी घेतली. यानंतर ते रुग्णालयात निवासी डॉक्टर म्हणून नोकरी करू लागले. त्यांना आयुष्यभर डॉक्टरी पेशात रहायचं नव्हतं. सरकारी सेवेत जाण्याची त्यांची इच्छा होती. यासाठी त्यांनी नोकरी करत असताना UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. कुटुंबाच्या आर्थिक दुर्बलतेमुळे त्यांना नोकरी सोडता आली नाही. नोकरी आणि अभ्यास अशी तारेवरची कसरत सुरु होती.
नोकरीसह दररोज 6 ते 8 तास अभ्यास
रुग्णांवर औषधोपचार करत असताना नागार्जुन यांना UPSC चे ध्येय गाठायचे होते. रुग्णालयात नोकरी करत असताना त्यांनी दररोज सुमारे 6 ते 8 तास स्पर्धा परीक्षेचा अभ्यास (Career Success Story) केला. अभ्यासाची रणनीती योग्य असेल तर नोकरी करूनही परीक्षा पास करता येवू शकते, असा त्यांचा विश्वास होता.
स्मार्ट स्टडी पॅटर्न आणि स्पेशल स्ट्रॅटेजीचा अवलंब केला
स्मार्ट स्टडी पॅटर्न आणि स्पेशल स्ट्रॅटेजीने त्याने सरकारी नोकरीची तयारी केली. ते म्हणतात की, नोकरीसोबतच UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करण्याच्या फंदात पडू नये. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका आणि मॉक टेस्ट आणि निवडक अभ्यास सामग्रीवर लक्ष केंद्रित करणे फायद्याचे ठरते. यामुळे कोणताही विषय सुटत नाही आणि अमूल्य वेळही वाया जात नाही. नागार्जुन यांनी UPSC CSE 2018 परीक्षेत देशात 418 वा क्रमांक मिळविला होता.
नागार्जुनचा इतर उमेदवारांना सल्ला
नागार्जुन नवीन उमेदवारांना सल्ला देताना सांगतात, “जर तुम्हाला यूपीएससीची तयारी करायची असेल तर अपुऱ्या संसाधनांबद्दल रडत न बसता शक्य तितकी तयारी (Career Success Story) करत राहणे गरजेचे आहे. जर तुम्ही पक्के ठरवले तर तुम्ही नोकरी करूनही अभ्यासाची तयारी करू शकता आणि कोचिंगशिवायही परिक्षेत यश मिळवू शकता. यासाठी आवश्यक आहे तुमच्यातील हुशारीने, कठोर परिश्रम आणि संयम.”
पत्नीही आहे IAS (Career Success Story)
नागार्जुन बी गौडा यांनी एप्रिल 2022 मध्ये IAS सृष्टी जयंत देशमुख (IAS Srishti Deshmukh) यांच्याशी लग्न केले आहे. दोघांची भेट मसुरी येथे असलेल्या LBSNAA (LBSNAA) मध्ये IAS प्रशिक्षण केंद्रात झाली. लग्नानंतर नागार्जुनने त्याचे कॅडर बदलले. ही IAS अधिकाऱ्यांची जोडी सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. IAS सृष्टी या UPSC इच्छुकांसाठी पुस्तकेही लिहितात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com