Career Success Story : टॉपर्सच्या मुलाखती ऐकून अभ्यासाची रणनीती ठरवली; कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । UPSC असो की कोणतीही स्पर्धा परीक्षा.. यामध्ये (Career Success Story) यश मिळवण्यासाठी उमेदवार रात्रंदिवस मेहनत करतात. योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी ते कोचिंग क्लासकडे वळतात, जिथे ते तयारीसाठी प्रचंड फी ही खर्च करतात. पण आज आपण आशा IAS अधिकाऱ्याबद्दल जाणून घेणार आहोत, त्यांनी कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय ही परीक्षा पास केली आहे. हे यश अजून एका कारणाने विशेष ठरते कारण कोणतेही प्रशिक्षण न घेता अगदी पहिल्याच प्रयत्नात या उमेदवाराने सर्वात कठीण समजली जाणारी परीक्षा पास केली आहे. लघिमा तिवारी असं या अधिकारी महिलेचं नाव आहे. तिची कहाणी जाणून घेऊया…

टॉपर्सच्या मुलाखती ऐकून अभ्यासाची रणनीती ठरवली
आयएएस अधिकारी लघिमा तिवारी या राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील आहेत. त्यांनी दिल्ली तंत्रज्ञान विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे. यानंतर लघिमा यांनी यूपीएससी सिव्हिल (Career Success Story) सर्व्हिसेस परीक्षेची तयारी सुरू केली. मात्र, यासाठी त्यांनी कोणत्याही कोचिंगची मदत घेतली नाही. त्यासाठी लघिमा यांनी मागील वर्षांतील टॉपर्सच्या मुलाखती ऐकून स्वतःची अभ्यासाची रणनीती ठरवली आणि त्या दृष्टीने परीक्षेची तयार केली.

पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर केली UPSC ची तयारी
राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या लघिमा तिवारी यांनी आपले प्राथमिक शिक्षण राजस्थान येथूनच पूर्ण केले. यानंतर त्यांनी दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये पदवी पूर्ण केली. पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतर, त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगद्वारे (UPSC) आयोजित नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. ही परीक्षा देताना त्यांनी कोणतेही प्रशिक्षण घेतले नाही. परीक्षेचा पॅटर्न समजून घेण्यापासून ते प्रत्यक्षात परीक्षेची तयारी करण्यापर्यंत त्यांनी यूट्यूबवर टॉपर्सच्या मुलाखती पाहून अभ्यासाची रणनीती ठरवली.

पहिल्याच प्रयत्नात मिळवली 19 वी रॅंक (Career Success Story)
लघिमा तिवारी यांनी परीक्षेसाठी आखलेली रणनीती इतकी अचूक होती की त्यांनी पहिल्याच प्रयत्नात परीक्षा क्रॅक केली आणि त्यांनी संपूर्ण भारतात 19 वा क्रमांक मिळवला आहे. ही रँक मिळवून त्या आयएएस अधिकारी बनल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार लघिमा यांनी लेखी परीक्षेत 853 आणि व्यक्तिमत्व चाचणीत 180 गुण मिळवले होते. त्यांचा परीक्षेतील एकूण स्कोअर 1033 होता. त्या त्यांच्या यशाचे संपूर्ण श्रेय त्यांच्या पालकांना देतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com