Career Success Story : इंजिनिअरिंग नंतर दिली UPSC; IPS वडिलांची मुलगी जिद्दीने बनली IAS

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन | UPSC परीक्षा देताना काहीजण (Career Success Story) पहिल्याच प्रयत्नात पास होतात तर काहींना अनेक प्रयत्न करावे लागतात. काही उमेदवार बारावीनंतर लगेच तयारीला सुरुवात करतात तर काही ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर या परीक्षेसाठी धडपड सुरु करतात. परीक्षेत यशस्वी होण्यासाठी कोणत्याही उमेदवारावर खूप दबाव असतो. शिवाय, जेव्हा यूपीएससी परीक्षेचा प्रश्न येतो तेव्हा हा दबाव दुप्पट होतो. असाच काहीसा प्रकार आयएएस अधिकारी अनुपमा अंजलीच्या बाबतीत घडला. त्यांचे वडील आयपीएस (IPS) अधिकारी आहेत; यामुळे नागरी सेवा उत्तीर्ण होण्यासाठी ती स्वतःवर दबाव आणत होती.

पहिल्या प्रयत्नात अपयश 
2018 बॅचच्या IAS अधिकारी अनुपमा अंजलीने (Career Success Story) अभियांत्रिकी पदवी पूर्ण केल्यानंतर UPSC परीक्षेची तयारी सुरु केली. अनुपमा अंजली या दिल्लीच्या रहिवासी आहेत. येथील शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली. पदवीनंतर त्यांनी सरकारी नोकरीची तयारी सुरु केली. अनुपमा यांनी सलग दोनवेळा यूपीएससी (UPSC) ची परीक्षा दिली होती.  त्यांना पहिल्याच प्रयत्नात अपयश आले होते. पण हार न मानता दुप्पट मेहनत घेऊन त्यांनी दुसऱ्या प्रयत्नाची तयारी केली.

वडिलांनी अभ्यासात मदत केली (Career Success Story)
अनुपमा अंजली यांचे वडील आयपीएस अधिकारी आहेत. त्यांना सरकारी नोकरीत ३७ वर्षे पूर्ण झाली आहेत. अनुपमा यांचे आजोबाही सरकारी कर्मचारी होते. नागरी सेवा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी, अनुपमा यांनी प्रथम UPSC अभ्यासक्रम समजून घेतला आणि नंतर आवश्यक पुस्तकांची संपूर्ण यादी तयार केली. UPSC परीक्षेची तयारी करताना त्यांच्या वडिलांनी त्यांना खूप मदत केली.

अनुपमा अंजली 2017 च्या UPSC परीक्षेत 386 वा क्रमांक घेत IAS अधिकारी बनल्या. यानंतर LBSNAA मध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना आंध्र प्रदेश केडर देण्यात आले. त्यांची पहिली पोस्टिंग आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात जॉइंट कलेक्टर म्हणून झाली होती. लग्न झाल्यानंतर त्यांनी त्यांची केडर बदलली.

उत्तर आणि दक्षिण भारतीय रिती रिवाजानुसार केले लग्न
अनुपमा अंजली यांनी 2020 बॅचचे आयएएस अधिकारी हर्षित कुमार यांच्याशी लग्न केले. IAS हर्षित आणि अनुपमा यांनी उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय रितीरिवाजानुसार (Career Success Story) लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप पसंत केले गेले. हर्षित हा हरियाणा केडरचा आहे आणि त्यामुळे लग्नानंतर अनुपमालाही हरियाणा के रमध्ये नियुक्ती मिळाली. सध्या ते भिवानी येथे एडीसी पदावर कार्यरत आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com