करिअरनामा ऑनलाईन । काही लोक त्यांच्या आयुष्यात इतके दृढनिश्चयी (Career Success Story) आणि आत्मकेंद्रित असतात की अशी लोकं त्यांची स्वप्ने अगदी लहान वयातच पूर्ण करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका मुलीबद्दल सांगणार आहोत, जिने लहान वयातच आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न जिद्दीने पूर्ण केले आहे. महिला IAS अधिकारी ऐश्वर्या रामनाथन यांनी वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा एकदा नव्हे तर दोनदा पास केली आहे. त्याचवेळी ऐश्वर्याच्या बहिणीलाही IPS पद मिळाले आहे.
अवघ्या २४ व्या वर्षी झाली IAS
IAS अधिकारी ऐश्वर्या रामनाथन यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत; ज्यांनी वयाच्या 24 व्या वर्षी UPSC सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा दोनदा पास केली. ऐश्वर्या रामनाथन ही भारतातील सर्वात तरुण आयएएस (IAS) अधिकाऱ्यांपैकी एक आहे. जेव्हा त्यांचं वय फक्त 24 वर्षे होतं तेव्हा त्यांनी 2019 च्या UPSC परीक्षेत संपूर्ण भारतातून 47 व्या क्रमांकासह यश मिळविले. सध्या त्या तमिळनाडूतील तिरुवल्लूर येथे उपजिल्हाधिकारी पदावर तैनात आहेत.
जिल्हाधिकारी गगनदीपसिंग बेदी आहेत आदर्श
तामिळनाडूच्या किनारी जिल्ह्याच्या कुड्डालोर येथील (Career Success Story) असलेल्या ऐश्वर्या यांनी लहानपणापासूनच पूर, चक्रीवादळ आणि अतिवृष्टी यांसारख्या अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना केला आहे. विशेषत: 2004 च्या सुनामीचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. या आपत्ती काळात जिल्हाधिकारी गगनदीपसिंग बेदी यांनी केलेले काम पाहून ऐश्वर्या प्रभावित झाल्या. आयएएस होण्यासाठी त्यांच्यासाठी ही मोठी प्रेरणा होती.
वडील आहेत शेतकरी (Career Success Story)
ऐश्वर्या या एका सामान्य कुटुंबातून आल्या आहेत. त्यांचे वडील आर. रामनाथन हे काजू शेतकरी आहेत. तर त्यांची आई सरकारी नोकर आहेत. त्यांच्या आईचं अगदी लहान वयात लग्न झालं; पण यानंतर त्यांनी प्रयत्न करून सरकारी नोकरी मिळवली. त्यांनी मुलीला कलेक्टर होण्यासाठी नेहमीच प्रेरणा दिली.
पहिल्याच प्रयत्नात मिळवली 630 वी रँक
मनात मोठी स्वप्ने घेऊन ऐश्वर्याने 2017 मध्ये चेन्नईच्या अण्णा विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी मिळवली. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी UPSC कोचिंग घेऊन नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी अखिल भारतीय 630 वी रँक मिळवली होती आणि रेल्वे लेखा सेवेसाठी निवड झाली. मात्र त्यांचं आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्न होतं; म्हणून त्यांनी पुन्हा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.
दुसऱ्या प्रयत्नात आयएएस होण्याचे स्वप्न केले पूर्ण
ऐश्वर्या यांची रेल्वे लेखा सेवेसाठी निवड झाली होती मात्र (Career Success Story) त्या या पदावर समाधानी नव्हत्या. त्यांनी 2019 मध्ये पुन्हा परीक्षा दिली. हा त्यांचा दूसरा प्रयत्न होता. यावेळी त्यांनी UPSC परीक्षा अखिल भारतीय 47 व्या रँकसह यशस्वीपणे पास केली आणि अखेर त्यांचे IAS अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. निकालानंतर एका मुलाखतीत ईश्वर्याने सांगितले की, आयएएस अधिकारी बनणे हे त्यांचे बालपणीचे स्वप्न होते; ज्यासाठी त्यांच्या आईने नेहमीच त्यांना प्रेरित केले होते.
एक बहिण IAS तर दुसरी IPS
ऐश्वर्या सोशल मीडियावर विशेषत: इंस्टाग्रामवर खूप (Career Success Story) सक्रिय आहे, जिथे तिचे एक लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. विशेष म्हणजे, ईश्वर्याची बहीण सुष्मिता रामनाथन हिनेही यूपीएससी उत्तीर्ण केली असून ती सध्या आयपीएस पदाची धुरा सांभाळत आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com