Career Success Story : कोण आहेत अलख पांडे? ‘फिजिक्सवाला’ कंपनी विद्यार्थ्यांमध्ये कशी झाली लोकप्रिय

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । स्वतःवर विश्वास असेल तर माणूस कितीही कठीण परिस्थितीत (Career Success Story) आपले अस्तित्व सिद्ध करून जगासाठी प्रेरणा निर्माण करू शकतो. प्रयागराज (दिल्ली) येथील अलख पांडेय हे नाव त्यापैकीच एक आहे. शिक्षण क्षेत्रात अलख यांनी चमकदार कामगिरी केलीय. त्यांचा इथपर्यंतचा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या खडतर प्रवासाविषयी…

त्याचं असं झालं… बिकट कौटुंबिक परिस्थिती असल्याने भावंडांना शिक्षण देण्यासाठी अलख यांच्या वडिलांना त्यांचं राहतं घर विकावं लागलं. आपला निवारा आणि आयुष्यभर कमावलेलं धनही त्यांनी अलख व त्यांच्या बहिणीच्या शिक्षणासाठी खर्च केले. मुळचा पिंड शिक्षकाचा असल्याने अलख यांनी आयआयटीचं शिक्षण पूर्ण करून शिक्षकी पेशा स्वीकारला. (Career Success Story) त्यांचे सोशल मीडियावर व्हिडिओ पाहून अनअ‍ॅकॅडमी कंपनी प्रभावित झाली. त्यांना अनअ‍ॅकॅडमी कंपनीने वार्षिक 4 कोटी रुपयांच्या नोकरीची ऑफर केली होती. तसंच दुसऱ्या कंपनीने 7.5 कोटी रुपयांचं पॅकेज दिलं होतं पण अलख यांनी ही पॅकेज धुडकावत स्वतःची ‘फिजिक्सवाला’ ही शैक्षणिक कंपनी स्थापन केली. आज ही कंपनी देशातील 101 युनिकॉर्न कंपनीपैकी एक असून 1 अब्ज डॉलरपेक्षा अधिक त्याचे आर्थिक मूल्यांकन आहे. आज संपूर्ण देशात अलख यांचा ‘फिजिक्सवाला’ हा ब्रँड अल्पावधीत नावारूपाला आला आहे.

कोचिंग क्लासमध्ये केली नोकरी (Career Success Story)

अलख सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होते. कौटुंबिक स्थिती हालाखीची असताना त्याचा परिणाम त्यांनी शिक्षणावर होऊ दिला नाही. त्यांचे वडील सतीश व आई रजत यांनी अलख आणि बहीण आदिती यांच्या शिक्षणासाठी पैसे उभे करण्यासाठी घर विकलं. अलख यांचं शालेय शिक्षण प्रयागराजमध्ये बिशप जॉन्सन स्कूलमध्ये झालं. त्यांना 10 वीत 91% 12वीमध्ये 93.5% गुण मिळाले. कुटुंबाला हातभार लागावा म्हणून त्यांनी बारावीनंतर एका कोचिंग क्लासमध्ये 3 हजार रुपये महिना मोबदल्यावर शिकवणं सुरू केलं.

‘फिजिक्सवाला’ नावाने युट्युब चॅनेलची सुरूवात

अलख पांडेय कानपूर आयआयटीतून 2015 मध्ये बी.टेक झाले. पदवी नंतर त्यांनी त्याच संस्थेत शिकवणं सुरू केलं. शिक्षकीपेशा अवलंबलेल्या अलख यांनी त्यांचे सहकारी मित्र प्रतीक माहेश्वरींसोबत 2017 मध्ये ‘फिजिक्सवाला’ नावाने युट्युब चॅनेलची सुरूवात केली व आपली व्हिडिओ लेक्चर अपलोड करण्यास सुरुवात केली. प्रतीक यांनीही आयआयटी बीएचयूमधून इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलं असून, कंपनीचे सर्व व्यवहार प्रतीक पाहतात. (Career Success Story) या कंपनीमध्ये वेस्ट ब्रीज आणि जीएसव्ही व्हेंचर्सने 100 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांत अल्पावधीतच ते या माध्यमातून खूप प्रसिद्ध झाले. पाहता पाहता व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली.

लाखो विद्यार्थ्यांचं आवडतं अ‍ॅप

अलख पांडेय व त्यांचे सहकारी युट्युब चॅनलवर तीन वर्षे व्हिडिओ लेक्चर अपलोड करत होते. यानंतर कोरोना काळात त्यांनी NEET व JEE च्या विद्यार्थ्यांसाठी नवे अ‍ॅप सुरू केलं. केमिस्ट्री, फिजिक्सच्या अवघड प्रश्नांची उत्तरं येथे सहज मिळतात. हे अ‍ॅप आता खूप लोकप्रिय झालं आहे. यामुळेच (Career Success Story) फिजिक्सवाला युट्युब चॅनलचे 69 लाख subscriber झाले असून 50 लाख अ‍ॅप डाउनलोड झाले आहेत. 2020 मध्ये ‘फिजिक्सवाला’ला कंपनी अ‍ॅक्टमध्ये सामील करून घेण्यात आलं आहे. आज 2022 मध्ये फिजिक्सवाला कंपनी युनिकॉर्न कंपनी झाली आहे. आपल्या यशाचं श्रेय हे वडिल सतीश पांडेय आणि मित्र प्रतीक माहेश्वरी यांचं आहे असं अलख सांगतात.

यावरून असा बोध घेता येईल; कौटुंबिक (Career Success Story) स्थिती वाईट असली तरी ठरवल्यानंतर प्रामाणिकपणे आपल्या आवडीच्या क्षेत्रात सातत्याने काम करत राहिल्यास यश नक्की मिळतं आणि प्रेरणादायी उदाहरण जगासमोर ठेवता येतं हे अलख यांनी दाखवून दिलं आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com