Career : Air Force मध्ये होणार महिला अग्निवीरांची भरती; हवाई दल प्रमुखांनी केली मोठी घोषणा

करिअरनामा ऑनलाईन। तरुणांना देशसेवेची संधी मिळावी, तसंच पुरेसं मनुष्यबळ (Career) उपलब्ध व्हावं या उद्देशानं भारतीय सैन्य दलात अग्निवीरांची भरती केली जात आहे. काही महिन्यांपूर्वी या संदर्भात घोषणा करण्यात आली होती. तसंच त्याबाबतची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. आता भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी दि. 8 ऑक्टोबर रोजी साजऱ्या होणाऱ्या आज वायुसेना दिनाचे औचित्य साधून दोन महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. त्यानुसार भारतीय हवाई दलात अग्निपथ योजनेतून महिला अग्निवीरांची भरती केली जाणार आहे. तसंच हवाई दलात एक नवीन शाखा सुरू केली जाणार आहे.

‘वेपन सिस्टीम ब्रांच’

देशभरात दि. 8 ऑक्टोबर हा वायुसेना दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिनाचं औचित्य साधून एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी (Career) यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यानुसार, आता हवाई दलात पुढील वर्षापासून महिला अग्निवीरांची भरती केली जाणार आहे. तसंच नवीन ‘वेपन सिस्टीम ब्रांच’ अर्थात शस्त्र प्रणाली शाखा सुरू केली जाणार आहे. वायुसेना दिनानिमित्त चंडीगडमध्ये फुल डे रिहर्सलचं आयोजन करण्यात आलं आहे.

या दोन्ही घोषणांबाबत चौधरी यांनी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, “सरकारने भारतीय हवाई दलातील अधिकाऱ्यांसाठी वेपन सिस्टीम ब्रांच तयार करण्यास मान्यता दिली आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर प्रथमच नवीन ऑपरेशनल शाखा तयार होणार आहे. ही शाखा मूलतः हवाई दलातली सर्व प्रकारची अत्याधुनिक शस्त्रास्त्र प्रणाली हाताळेल. यामुळे 3400 कोटी रुपयांची बचत होईल. तसंच पुढील वर्षापासून हवाई दलात महिला अग्निवीरांची भरती करण्यासंदर्भात योजना आखली जात आहे.”

3000 अग्निवीरांची होणार भरती (Career)

“भारतीय हवाई दलात करिअर करण्यासाठी प्रत्येक अग्निवीराकडे योग्य कौशल्य आणि ज्ञान असावं यासाठी आम्ही आमच्या ऑपरेशनल प्रशिक्षण पद्धतीत बदल केला आहे. या वर्षी डिसेंबरमध्ये आम्ही 3000 अग्निवीर प्राथमिक प्रशिक्षणासाठी हवाई दलात समाविष्ट करणार आहोत. पुरेसा कर्मचारी वर्ग असावा यासाठी येत्या काही वर्षांत ही संख्या वाढवण्यात येईल. पुढच्या वर्षीपासून महिला अग्निवीरांना सहभागी करून घेण्याचाही आमचा विचार आहे. या संदर्भातल्या पायाभूत सुविधांचं काम प्रगतिपथावर आहे;” असं चौधरी यांनी स्पष्ट केलं.

अग्निपथ योजनेद्वारे हवाई दलात हवाई योद्ध्यांचा समावेश करणं हे आव्हानात्मक काम असू शकतं; पण त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे हवाई दलाला भारताच्या क्षमतेचा उपयोग करून घेण्याची ही संधी असेल. विशेष म्हणजे यावर्षी जूनमध्ये घोषित करण्यात आलेल्या अग्निपथ योजनेवरून (Career) देशभरात वाद निर्माण झाला होता. यावरून अनेक ठिकाणी जाळपोळही झाली होती; मात्र जेव्हा सरकारने या भरतीसंदर्भात अधिसूचना जारी केली, तेव्हा मोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत ही वस्तुस्थिती आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com