करिअरनामा ऑनलाईन। असं म्हणतात की शिक्षण (Career Options from Commerce Stream) घेतल्यामुळे देशाची प्रगती होते. त्यामुळे आपल्या देशातील जेवढे तरुण शिक्षित होतील, तेवढीच आपली प्रगती देखील चांगली होईल. काही वर्षांपूर्वी डॉक्टर किंवा इंजिनियर होणं म्हणजे मोठ्या अचीव्हमेंट्स मानल्या जायच्या. पण आजकाल या विचारांत बदल होताना दिसतोय. तरुण मुलं जास्तीत जास्त पर्याय शोधू पाहतायेत, काहीतरी नवीन करण्याची इच्छा त्यांच्या मनात तयार होत आहे. मग अशावेळी आर्ट्स घेतलं म्हणजे टीचिंग फील्ड, सायन्स घेतलं तर इंजिनियर किंवा डॉक्टर आणि कॉमर्स म्हणजे सीए ही चौकट मोडली जात आहे. इंटरनेटच्या या जगात अगदी सोप्या पद्धतीने नवनवीन करिअर ऑप्शन्स शोधले जाऊ शकतात. कॉमर्स मधून 12वी केल्यानंतर केवळ सीए (CA) किंवा सी एस (CS) न करता याशिवाय काही वेगळं करिअर निवडले जाऊ शकते हे तुम्हाला माहित आहे का? तर काय आहेत या वेगळ्या दिशा जाणून घेण्यासाठी पुढे नक्की वाचा….
कोणत्या आहेत ह्या वेगळ्या दिशा?
1. Event Management
2. Business
3. MBA
4. MA-Economics
1. Event Management : आजकाल लग्न, मुंजी अशा पारंपारिक समारंभांपासून अनेक प्रकारच्या पार्ट्या आयोजित केल्या जातात. आणि इथे प्रकर्षाने गरज असते ती एका इव्हेंट मॅनेजरची. तुम्हाला जर मॅनेजमेंटची आवड असेल तर इव्हेंट मॅनेजमेंट ह्या क्षेत्रात नवनवीन संधी उपलब्ध आहेत. इथे तुमच्याजवळ आलेल्या इव्हेंटचंं प्लॅनिंग करणं, त्याच्यासाठी लागणारा खर्च, गरज पडल्यास स्टेज शो, येणाऱ्या पाहुण्यांसाठी बैठक व्यवस्था आणि जेवणाची सोय यासारख्या गोष्टींची तयारी करावी लागते. एका गटाचं कुशल नेतृत्व करणारा माणूस, संयमासह यामध्ये करिअर घडवू शकतो.
12वीत पडलेल्या मार्कनुसार इव्हेंट मॅनेजमेंटसाठी ऍडमिशन दिली जाते, यात डिग्री किंवा डिप्लोमा असे दोन्हीही ऑप्शन्स खुले आहेत. उत्कृष्ट कम्युनिकेशन स्किल्स, टाईम मॅनेजमेंट, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स यांच्या जोरावर इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये करिअर केलं जाऊ शकतं.
Top Colleges : (Career Options from Commerce Stream) National Institute Of Event Management(Delhi), Pearl Academy (Jaipur), Chandigarh University, DY Patil International University
2. Business : जर तुम्हाला कोणाच्या हाताखाली काम करायची इच्छा नसेल, तर अशावेळी तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरु करु शकता. अनेकदा यासाठी कुठल्या विशिष्ट डिग्रीची गरज नसते. आपल्याजवळ असलेल्या स्किल्सचा वापर करुन आपण उत्तमरित्या एखादा व्यवसाय करु शकतो. पण अशावेळी कॉमर्समधून घेतलेली डिग्री तुम्हाला या क्षेत्राबद्दल जास्त माहिती देऊ शकते. त्यामुळे बारावीनंतर MBA, B. Com, मार्केटिंग सारखे कोर्सेस घेऊन तुम्ही तुमच्या आवडत्या बिजनेसची सुरुवात करु शकता. बिझनेसची सुरुवात करताना सुद्धा भरपूर संयमाची गरज असते, याव्यतिरिक्त तुम्ही एका गटासोबत काम करत असता त्यामुळे त्याचं नेतृत्व कसं करावं हे देखील तुम्हाला समजलं पाहिजे.
3. MBA : बारावी झाल्यानंतर तुम्ही बीबीए(BBA) आणि त्यानंतर एमबीए(MBA) ची डिग्री मिळवू शकता. मार्केटिंग व्यतिरिक्त तुम्ही इव्हेंट मॅनेजमेंट, ट्रॅव्हल एंड टुरिझम मधून देखील डिग्री मिळवू शकता. त्यामुळे तुमच्या आवडी ओळखून तुम्ही हा कोर्स निवडला पाहिजे. एमबीए मध्ये प्रोडक्ट मॅनेजर, बिझनेस एनालिस्ट, डिजिटल मार्केटिंग मॅनेजर, फायनान्स मॅनेजर अशा काही पोझिशन्स उपलब्ध असतात. भारतात अशी अनेक कॉलेजेस आहेत जी एमबीएची डिग्री तुम्हाला मिळवून देऊ शकतात. त्यामुळे जर तुम्हाला ऑफिस वर्क करायचा असेल तर एमबीए ही एक उत्तम संधी उपलब्ध आहे.
Top Colleges : IIM ( Lakhnow), IIM( Indore), IIM( Ahmedabad)
4. MA. Economics : तुम्हाला कॉलेज किंवा हायर सेकंडरी मध्ये प्राध्यापक म्हणून काम करण्याची इच्छा असल्यास एमए इकॉनॉमिक्स ही डिग्री मिळवली जाऊ शकते. बारावीनंतर कॉमर्स या फिल्ड मधून बी इकॉनॉमिक्स आणि त्यानंतर एमएची पदवी मिळवली जाते. मुळातच इकॉनॉमिक्स (Career Options from Commerce Stream) या विषयात असलेल्या आवडीमुळे तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये HoD चे पद सुद्धा मिळवू शकता. मात्र कॉलेजमध्ये सह प्राध्यापक म्हणून रुजू होण्यासाठी या NET/SET परीक्षांची आवश्यकता आहे त्याचबरोबर कुठल्या कॉलेजमध्ये तुम्ही अर्ज करत आहात त्यानुसार कदाचित तुम्हाला PhDची गरज वाटू शकते.
Top Colleges : LSR( Delhi), Christ University ( Bangalore), MCC( Chennai), Morden College (Pune).
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com