Career News : IIT Gold Medalist ने घेतला संन्यास; ‘हे’ आहे कारण

करिअरनामा ऑनलाईन। बहुतेक लोकांना लक्झरी लाइफ जगायला आवडतं. त्यासाठी (Career News) ते भरपूर पैसे कमावण्याचा प्रयत्न करतात आणि कधी कधी नैतिक आणि अनैतिक यातील फरक विसरून जातात. आजकाल साधू असलेल्या एका माणसाची गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण हे साधू एकेकाळी आयआयटी दिल्लीचे टॉपर्स राहिलेले आहेत. आपण असं का केलं याचं कारण आता या व्यक्तीनं सांगितलंय.

आयआयटीचे गोल्ड मेडलिस्ट 

या व्यक्तीने मॅनेजर पदाचा त्याग केलाय आणि ही व्यक्ती आता साधू बनलीय. मूळचे बिहारचे असलेले संदीपकुमार भट्ट यांनी 2002 मध्ये आयआयटी, दिल्ली येथून B.Tech मधून शिक्षण पूर्ण केले. ते त्यांच्या बॅचचे गोल्ड मेडल विजेते होते.

2004 मध्ये त्यांनी M.Tech ही केलं होतं. अभ्यासक्रम पूर्ण (Career News) करताच त्यांनी एका मोठ्या कंपनीत मॅनेजर म्हणूनही काम केले. पण मग असं काय झालं की त्यांचं जगाबद्दलचं आकर्षण संपलं आणि त्यांनी संन्यासीचा मार्ग स्वीकारला. नुकतंच त्यांनी एका मुलाखतीत याबाबत सांगितलंय.

का सगळं सोडून दिलं (Career News)

मीडिया रिपोर्टनुसार, संदीप कुमार भट्ट यांनी वयाच्या 28 व्या वर्षी निवृत्ती घेतली. 2007 मध्ये ते साधू झाले. साधू झाल्यानंतर ते स्वामी सुंदर गोपालदास म्हणून ओळखले जाऊ लागले.

याबाबत बोलताना स्वामी सुंदर गोपालदास स्वत: सांगितात की, इंजिनीअर, डॉक्टर, आयएएस, न्यायाधीश, शास्त्रज्ञ, नेते समाजात अनेक सापडतील. पण समाजाला वेगळा मार्ग दाखवणं किंवा लोकांचं चारित्र्य घडवणं असं ध्येय ठेवणारी माणसं सापडणार नाहीत. समाजात पसरलेल्या चुकीच्या गोष्टी दूर करण्यासाठी धार्मिक शिक्षण हा एकमेव मार्ग आहे, असं मत ते व्यक्त करतात.

स्वामी सुंदर गोपालदास म्हणतात नोबेल पारितोषिक मिळणं ही काही फार मोठी गोष्ट नाही, पण बिघडलेल्या माणसाला सुधारणं हे फार मोठं काम आहे. यंत्राचा दर्जा वाढत चाललाय, पण माणसाचा दर्जा मात्र कमी होत चाललाय; असं स्वामी सुंदर गोपालदास यांचं मत आहे.

सुशिक्षित लोकांनी संत बनले पाहिजे, असेही त्यांचे म्हणणे आहे. चांगला (Career News) समाज वाढवायचा असेल तर अशा लोकांनीही पुढे यायला हवं. यासाठीच मी संत मार्गाला लागलो असंही ते सांगतात.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com