करिअरनामा ऑनलाईन | राज्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या गोर-गरीब, वंचित, बहुजन व (Career News) शेतकऱ्यांच्या मुलामुलींसह शिक्षकांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. राज्यातील 0 ते 20 विद्यार्थी पटसंख्या असलेल्या तब्बल 14 हजार 985 शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
राज्य सरकारमार्फत 0 ते 20 विद्यार्थी पटसंख्येच्या राज्यात किती शाळा आहेत आणि या शाळा बंद करण्याबाबतची कार्यवाही कोणत्या स्तरावर आहे ? याबाबतची माहिती मागविण्यात आली होती. पटसंख्या 20 पेक्षा कमी असणाऱ्या शाळा मुख्यत: ग्रामीण, दुर्गम भागात असल्याचे यापूर्वीही समोर आले (Career News) असून, आता पुन्हा एकदा जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत या शाळांमधील विद्यार्थिसंख्येचा आढावा घेण्यात आला आहे. यानुसार शैक्षणिक वर्ष 2021-22 च्या संचमान्यतेनुसार राज्यातील 14 हजार 985 शाळांची पटसंख्या 20 पेक्षा कमी असल्याचे समोर आले आहे.
शासनाच्या या निर्णयाला मोठा विरोध
राज्य शासनाच्या या निर्णयाला मोठा विरोध होत आहे. शिक्षकांनीही आक्रमक पवित्र घेतला असून ठिकठिकाणी आंदोलने, उपोषणे सुरु झाली आहे. या निर्णयामुळे दुर्गम भागात राहणाऱ्या गोर-गरीब, वंचित, बहुजन व शेतकर्यांची मुले आणि मुले कायमची शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
20 पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा बंद झाल्यास उद्भवणार्या धोक्याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, असा सूर राज्यातून उमटू लागला आहे. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांकडून (Career News) चालवण्यात येत असलेल्या 13 हजार 479, अनुदानित 297 आणि विनाअनुदानित 970 शाळा आहेत. त्यामुळे तब्बल 2 ते 3 लाख विद्यार्थी शिक्षणाला मुकण्याची शक्यता आहे तर 18 हजार शिक्षकांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विभागनिहाय 0 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळांची आकडेवारी पुढीलप्रमाणे – (Career News)
कोकण विभाग : –
मुंबई – 117
पालघर – 317
ठाणे – 441
रत्नागिरी – 1375
सिंधुदुर्ग – 835
रायगड – 1295
नाशिक विभाग :-
नाशिक – 331
जळगाव – 107
अहमदनगर – 775
धुळे – 92
नंदुरबार – 189
पुणे विभाग :-
पुणे – 1132
सातारा – 1039
सोलापूर – 342 (Career News)
सांगली – 415
कोल्हापूर – 507
औरंगाबाद विभाग :-
औरंगाबाद – 347
बीड – 533,
जालना -180,
लातूर – 202,
नांदेड – 394,
उस्मनाबाद – 174,
परभणी – 126,
हिंगोली – 93
नागपूर विभाग :-
नागपूर 555,
चंद्रपूर 437,
वर्धा 398 ,
गडचिरोली 641,
गोंदिया 213,
भंडारा 141.
अमरावती विभाग :-
अमरावती – 394
अकोला – 193
बुलढाणा – 158
वाशिम – 133
यवतमाळ – 350
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com