करिअरनामा ऑनलाईन । बारावीचा निकाल लागल्यावर (Career Mantra) अनेक विद्यार्थी करिअरची दिशा शोधू लागतात. शिक्षण सुरु असताना विद्यार्थ्यांना करिअरची चिंता वाटू लागते. भविष्यात आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू नये यासाठी कोणता कोर्स करायचा? याचा विचार विद्यार्थी करु लागतात. काही विद्यार्थ्यांना वेळीच त्यांच्या पालकांकडून किंवा समुपदेशकाकडून चांगले मार्गदर्शन मिळते; यामुळे त्यांचे करिअर योग्य दिशेने वाटचाल करते. पण सर्वच तरुणांच्या बाबतीत असं होईल याची शाश्वती नाही. अशावेळी काय करायचं? हा प्रश्न पडतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला तुमचं भविष्य घडवण्यात मदत करु शकतील अशा कोर्सबद्दल सांगणार आहोत. जाणून घेवूया सविस्तर….
1. मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (MBA)
प्रतिष्ठित अभ्यासक्रमांच्या यादीत एमबीएचे (MBA) नाव नक्कीच पहिल्या नंबर वर येते. एमबीएचा अभ्यासक्रम शिकवणाऱ्या अनेक संस्था आहेत. तुम्ही एमबीए करण्याचा विचार करत असाल तर हा अभ्यासक्रम आयआयएमसारख्या (IIM) मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमधून करणं उत्तम ठरु शकतं.
भविष्यात मिळेल चांगले पॅकेज (Career Mantra)
जर तुम्ही आयआयएम सारख्या नामांकित संस्थेतून एमबीए केले तर भविष्यात तुम्हाला नोकरीत चांगले पॅकेज देखील मिळेल. असे असले तरी आयआयएममध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला चांगल्या टक्केवारीसह उत्तीर्ण व्हावे लागेल.
आवश्यक पात्रता
एमबीए करण्यासाठी तुम्ही बारावी कोणत्या स्ट्रीममधून करायची असा प्रश्न तुमच्या मनात असेल तर तुम्ही कोणत्याही स्ट्रीममधून उत्तीर्ण असाल तरी एमबीए करू शकता. पण कॉमर्समधून बारावी केली असेल तर ते अभ्यास करताना अधिक फायदेशीर ठरु शकते.
2. एमबीबीएस (MBBS)
एमबीबीस पदवी मिळवून तुम्ही रुग्णसेवा करु शकता. आपल्या (Career Mantra) समाजात डॉक्टरांना देवाचे दुसरे रूप मानले जाते. डॉक्टर लोकांचे प्राण वाचवतात, रुग्णांना व्याधी मुक्त करतात त्यामुळे अनेक लहान मुलांना मोठेपणी डॉक्टर बनण्याची इच्छा असते.
मिळवावी लागेल NEET परीक्षेत चांगली रँक
आयुष्यात चांगला अभ्यास करून डॉक्टर झालात तर तुम्ही दरमहा लाखो रुपये कमवू शकता. डॉक्टर बनण्यासाठी काय करावे लागते हे समजून घ्या. डॉक्टर होण्यासाठी एमबीबीएस करावे लागते. एमबीबीएसमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी तुम्हाला NEET परीक्षेत चांगली रँक मिळवावी लागेल.
3. चार्टर्ड अकाउंटंट (CA)
करिअर क्षेत्रात सीए म्हणजेच चार्टर्ड अकाउंटंट कोर्स देखील प्रतिष्ठीत कोर्स मानला जातो. सीए करुन तुम्ही चांगली कमाई करू शकता. चार्टर्ड अकाउंटंट कर भरण्यासाठी उपयुक्त ठरतो. त्यामुळे जर तुम्ही सीए कोर्स पूर्ण केलात तर तुमचे भविष्य सुरक्षित होते.
मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरीची संधी
सीए केल्यानंतर तुम्हाला मोठ्या कंपन्यांकडून (Career Mantra) नोकरी मिळू शकते. या कंपन्या सीएला करोडोंचे पॅकेज देतात. सीए बनण्यासाठी तुम्हाला सीएची परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com