Career Mantra : बदलत्या तंत्रज्ञानासोबत अपडेट राहण्यासाठी करा ‘हे’ कोर्सेस

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षणाची प्रक्रिया कधीच संपत नाही. जर (Career Mantra) तुम्हाला करिअरमध्ये प्रगती करायची असेल तर सतत शिकत राहणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येकवेळी पदवी घेणे महत्वाचे नाही. वेगवेगळे व्यावसायिक कोर्सकरुन सुध्दा तुम्ही ज्ञान मिळवू शकता. असे कोर्स केल्यामुळे तुमच्या ज्ञानात भर पडेलच शिवाय करिअरमध्येही कमालीची प्रगती होते. अशा विविध कोर्सेसबद्दल जाणून घेण्यासाठी पुढे वाचा…

नोकरी करत असताना सध्याच्या काळात सतत अपडेट राहणं खूप महत्वाचं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये दररोज नवनवीन बदल होत असतात. हे बदल शिकण्यासाठी क्रॅश कोर्स किंवा तीन महिने, सहा महिन्याचे (Career Mantra) सर्टिफिकेशन कोर्स करावे लागतात. बदलत्या तंत्रज्ञानासोबत अपडेट राहण्यासाठी आवश्यक असलेल्या कोर्सची निवड व्यक्तीच्या कामाच्या क्षेत्रावर, करियरच्या उद्दिष्टांवर आणि आवश्यक कौशल्यांवर अवलंबून असते. त्यामुळे वैयक्तिक निवडीनुसार तुम्हाला कोर्स करणे गरजेचे आहे. आज आपण काही महत्वाच्या क्षेत्रासंबंधीत प्रगतीसाठी कोणते कोर्स करू शकतो (क्षेत्रानुसार) याबद्दल माहिती घेणार आहोत.

विज्ञान आणि अभियांत्रिकी (Science and Engineering) –
मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स – प्रगत मशीन लर्निंग, न्यूरल नेटवर्क.
अभियांत्रिकी – CAD सॉफ्टवेअर, स्ट्रक्चरल विश्लेषण.
– आयटी आणि तंत्रज्ञान (IT and Technology) (Career Mantra) –
डेटा सायन्स – पायथन, आर, मशीन लर्निंग, डेटा विश्लेषण.
क्लाउड कम्प्युटिंग – AWS, Google Cloud, Microsoft Azure.
साइबर सुरक्षा – एथिकल हॅकिंग, सायबर सुरक्षा मूलभूत तत्त्वे, घटना प्रतिसाद.
– वेब डेव्हलपमेंट (Web development) – HTML, CSS, JavaScript, React, Angular.

उद्योजकता (Entrepreneurship) –
स्टार्टअप्स – उद्योजकता मूलभूत तत्त्वे, (Career Mantra) व्यवसाय योजना विकास, निधी उभारणी धोरणे.
व्यवसाय आणि व्यवस्थापन (Business and Management) –
व्यवस्थापन – PMP (प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोफेशनल), चपळ, स्क्रम.
– मार्केटिंग (Marketing)- डिजिटल मार्केटिंग, एसइओ, कंटेंट मार्केटिंग.
वित्तीय विश्लेषण – आर्थिक विश्लेषण, गुंतवणूक बँकिंग, लेखा तत्त्वे.
नेतृत्व विकास – नेतृत्व कौशल्य, धोरणात्मक व्यवस्थापन, बदल व्यवस्थापन.

मानव संसाधन (Human Resources) –
एचआर मॅनेजमेंट – एचआर प्रमाणपत्र, भरती धोरणे, कर्मचारी संबंध.
वेतन व्यवस्थापन – वेतन (Career Mantra) व्यवस्थापन, भरपाई आणि फायदे
– सेवा क्षेत्र (Service Sector) –
ग्राहक सेवा – ग्राहक संबंध व्यवस्थापन (CRM), सेवा उत्कृष्टता.
– सॉफ्ट स्किल्स (Soft Skills) –
संवाद कौशल्य – सार्वजनिक बोलणे, प्रभावी संवाद, वाटाघाटी कौशल्ये.
वेळ व्यवस्थापन – वेळ व्यवस्थापन तंत्र, उत्पादकता हॅक्स.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com