Career Mantra : करिअरमधील प्रगतीसह तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी ‘या’ सॉफ्ट स्किल्स शिकाच

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । कामाच्या ठिकाणी तुमची कार्यक्षमता (Career Mantra) वाढवण्यासाठी आणि व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी सॉफ्ट स्किल्स विकसित करणे अत्यंत महत्वाचे आहे. यामुळे तुम्हाला नवनवीन करिअरच्या संधीही मिळतात. ही कौशल्ये तुम्हाला केवळ नोकरी मिळवून देत नाहीत, तर कामाच्या ठिकाणी तुमची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि तुमच्या व्यक्तिमत्वात विकास करण्यासाठी मदत करतात. तुम्हाला नवनवीन संधीही या सॉफ्ट सिक्ल्समुळे मिळू शकतात. जाणून घेऊया सविस्तर….

1. टीमवर्क –
– सहकाऱ्यांसोबत एकत्रितपणे काम करून उद्दिष्ट साध्य करणे.
– विविध प्रकारच्या लोकांसोबत कार्य करताना सुसंवाद ठेवणे.

2. संवाद कौशल्ये (Career Mantra) –
– स्पष्ट, प्रभावी आणि आत्मविश्वासाने बोलणे हे कौशल्य सहकारी, वरिष्ठ अधिकारी, किंवा ग्राहक यांच्याशी संवाद साधताना उपयुक्त ठरते.
– लेखी संवाद – ईमेल, रिपोर्ट्स, आणि अन्य दस्तऐवज प्रभावीपणे तयार करण्याची क्षमता असणे.
– ऐकून घेणण्याची क्षमता – इतरांचे विचार आणि भावना समजून घेऊन त्यांना प्रतिसाद देणे.

3. नेतृत्व –
– इतरांना प्रोत्साहित करून त्यांचा काम करण्याचा उत्साह वाढवणे.
– योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन त्याची जबाबदारी घेणे.
– कामाचे योग्य विभाजन करून वेळेत ध्येय साध्य करणे.
– समस्यांचे निराकरण करण्यासाठी योग्य उपाययोजना ठरवणे.

4. वेळेचे व्यवस्थापन –
– महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देऊन वेळेचे नियोजन करणे.
– कमी वेळेत अधिक (Career Mantra) काम पूर्ण करणे.
– अंतिम मुदतींचे पालन करणे.

5. जुळवून घेण्याची क्षमता-
– बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेणे.
– सतत नवीन कौशल्ये शिकण्याची आणि स्वतःला अद्ययावत ठेवण्याची तयारी.

6. नवीन गोष्टी शिका –
-उद्योगातील बदलानुसार नवीन तंत्रज्ञान आणि प्रक्रिया शिकणे.

7. भावनात्मक बुद्धिमत्ता –
– आपल्या भावना आणि विचार ओळखणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे.
– इतरांच्या भावनांचा आदर ठेवणे आणि त्यांना योग्य प्रतिसाद देणे.
– तणावाखाली शांत राहून काम करणे.
– आपले विचार, अनुभव, आणि ज्ञान इतरांशी प्रभावीपणे शेअर करणे.

नेटवर्किंग (Career Mantra) –
– प्रभावी व्यावसायिक नेटवर्क तयार करणे आणि त्यांचे पोषण करणे.
– आपल्या नेटवर्कचा उपयोग करून नवीन करिअर संधी शोधणे.
हे सॉफ्ट स्किल्स तुमच्या करिअरच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक आहेत. या स्किल्समध्ये प्राविण्य मिळवल्यास केवळ नोकरीसाठीच नाही तर तुमच्या व्यक्तिमत्वाच्या संपूर्ण जडण घडणीत हे स्किल्स फायदेशीर ठरणार आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com