Career Mantra : 10वी नंतर करा ‘हा’ कोर्स; मिळू शकते सरकारी नोकरी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । दहावी पास होताच विद्यार्थ्यांना त्यांच्या (Career Mantra) करिअरची चिंता वाटू लागते. काही दिवसांपूर्वीच 10 वी आणि 12 वी च्या परीक्षा पूर्ण झाल्या आहेत . परीक्षा तर झाली; पण सुट्टीमध्ये कोणता कोर्स करायचा; जेणेकरून विद्यार्थ्यांचा वेळ सत्कारणी लागेल आणि भविष्यात हे कोर्स केल्यानंतर त्यांना खासगी नोकरी तर मिळेलच, शिवाय तो सरकारी नोकरीसाठीही पात्र ठरेल. आज आम्ही तुम्हाला तुमच्या करिअरशी संबंधित काही उपयुक्त माहिती देणार आहोत. जे तुमच्या करिअरला पंख लावतील.

पॉलिटेक्निक कोर्स (Career Mantra)
जर तुम्हाला 10वी नंतर अभियंता व्हायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला 10वी नंतर डिप्लोमा कोर्स करावा लागेल, जो पॉलिटेक्निक कोर्स म्हणून ओळखला जातो. पॉलिटेक्निक कोर्स सरकारी आणि खाजगी दोन्ही महाविद्यालयांमधून केला जातो. कोणत्याही पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी, विद्यार्थ्याला प्रवेश परीक्षेच्या प्रक्रियेतून जावे लागेल आणि ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच तुम्हाला या (Career Mantra) अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर, सुरवातीला 15,000 ते 30,000 रुपये दरमहा पगार मिळू शकतो. या कोर्सद्वारे तुम्ही अभियांत्रिकी संबंधित अभ्यासक्रम करू शकता. आम्‍ही तुम्‍हाला याच्याशी संबंधित काही कोर्सेसची माहिती देत ​​आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमचे करिअर घडवू शकता.

कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) –
आज प्रत्येक विद्यार्थ्याला सरकारी नोकरी मिळवायची आहे. अशा परिस्थितीत पॉलिटेक्निक कोर्स कनिष्ठ अभियंता म्हणजेच Junior Engineering चा अभ्यासक्रम देते. हा (Career Mantra) अत्यंत महत्त्वाचा अभ्यासक्रम आहे. हा कोर्स 3 वर्षांचा असून तो केल्यानंतर तुम्ही कनिष्ठ अभियंता बनू शकता. पॉलिटेक्निक आणि बीटेक विद्यार्थ्यांना एकाच पगारावर नोकरी देणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. वास्तविक, तांत्रिक ज्ञान दोन्हीसाठी समान आहे, जे एखाद्या चांगल्या कंपनीला उमेदवाराकडून आवश्यक असते.

कौशल्यावर आधारित शिक्षण (Skill Based Learning)
विशेष म्हणजे पॉलिटेक्निक शिक्षण हे कौशल्यावर आधारित शिक्षण आहे, ज्यामध्ये B.tech शी संबंधित अभ्यासक्रम शिकवले जातात. या कोर्सनंतर तुम्ही थेट (Career Mantra) कोणत्याही कंपनीत कनिष्ठ अभियंता पद भूषवू शकता, त्यामुळे या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी उत्सुक दिसतात.

कसा घ्यायचा प्रवेश (Career Mantra)
या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्रवेश परीक्षेसाठी फॉर्म भरले जातात. प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जातो. त्यानंतर निकालाच्या आधारे विद्यार्थ्याला संस्था किंवा महाविद्यालयही मिळते.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com