Career Mantra : तुमच्याकडे डिग्री नाही?? घाबरु नका…’या’ मार्गातून तुम्ही करू शकता मोठी कमाई 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । उत्तम करिअरसाठी चांगले शिक्षण (Career Mantra) आणि अनुभव असणे अत्यंत आवश्यक आहे. पण असे काही लोक आहेत ज्यांना कॉलेजमध्ये जाऊन शिकता येत नाही, ज्यांच्याकडे कोणतीही पदवी नाही त्यांच्यासाठी असे अनेक करिअरचे (Career) पर्याय आहेत ज्यात तुम्ही पदवी नसतानाही चांगली कमाई करू शकता. आज आम्ही तुम्हाला अशा करिअर पर्यायांबद्दल सांगत आहोत.

Career Mantra

1. वेबसाइट विकसक (Website Developer) –
जर तुम्ही महाविद्यालयात असाल आणि तंत्रज्ञान क्षेत्रात पुढील करिअर घडवायचे असेल तर तुम्ही छोट्या बजेटमध्ये स्टार्टअपसाठी वेबसाइट सुरु करू शकता. यासाठी पदवी घेण्याची गरज नाही.
पगार – जे विद्यार्थी त्यांच्या स्टार्टअपसाठी वेबसाइट बनवत आहेत त्यापैकी बहुतेकांनी याबद्दल यूट्यूबवर शिक्षण घेतले आहे आणि प्रत्येक वेबसाइट तयार करण्यासाठी त्यांना 30,000 रुपये पगार मिळतो.

Career Mantra

2. अनुवादक (Translators)
तुम्हाला अनेक भाषा येत असतील आणि नवीन भाषा शिकण्याची आवड असेल, तर तुम्ही भाषांतरकाराच्या पदांवर काम करू शकता.
पगार (Salary) – या माध्यमातून तुम्हाला मिळणारे पैसे असाइनमेंटवर अवलंबून असतात. अनुवादक प्रति भाषांतर किमान 25,000 रुपये कमवू शकतात.

Career Mantra

3. कार्यक्रम नियोजक (Event Planner) –
भारतात विवाहसोहळे जितके भव्य होतात त्या प्रमाणात इव्हेंट प्लॅनरची मागणी वाढत आहे. इव्हेंट प्लॅनरला कोणत्याही औपचारिक पदवीची आवश्यकता नसते, परंतु चांगले संभाषण कौशल्य, सर्जनशील कल्पना आणि नाविन्यपूर्ण डिझाइन तयार करणे ही कौशल्ये त्याच्याकडे असणे आवश्यक आहे.
पगार – इव्हेंट प्लॅनिंगमध्ये काम करत असताना तुम्हाला (Career Mantra) मिळालेल्या कामावर तुमची कमाई अवलंबून असते. तुम्हाला साधारण प्रति इव्हेंट 10,000 ते 80,000 रुपये मिळू शकतात. तसेच या क्षेत्रात कमाईला मर्यादा नाही; हे देखील ध्यानात घ्यायला हवं.

 

Career Mantra

4. सोशल मिडिया मॅनेजर (Social Media Manager)
गेल्या काही वर्षांत सोशल मीडिया मार्केटिंगमधील नोकऱ्या, एजन्सी आणि फ्रीलांसरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. छोट्या स्टार्ट-अपपासून ते मोठ्या ब्रँडपर्यंत, प्रत्येकाला वेगळ्या दृष्टिकोनाची आवश्यकता असते. त्यांचे प्रेक्षक त्यांच्या फेसबुक पेजवर काय पाहतात हे त्यांना कळले पाहिजे. हे काम सोशल मीडिया मॅनेजर करतात.
पगार – सोशल मीडिया मॅनेजरला दरमहा 60,000 रुपयांपर्यंत पगार मिळतो.

career mantra

5. कलाकार / पेंटर (Artist / Painter)
आज सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक कलाकार आपल्यातील कला जगभर दाखवत आहेत. त्यामुळे काही वेळा या कलाकारांना प्रसिद्ध ब्रँडच्या सहकार्याने चांगले काम मिळते. ज्यामुळे ते लोकांमध्ये आपले काम दाखवू शकतात. आणि हे एक क्रिएटिव्ह क्षेत्र आहे; त्यामुळे तुम्हाला (Career Mantra) या क्षेत्रात काम करण्यासाठी कोणत्याही पदवीची आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्यातील अंगभूत कलेच्या माध्यमातून या क्षेत्रात आपला ठसा उमटवू शकता.
पगार – येथे तुम्ही तुमच्या कामानुसार तुमच्या कलेसाठी पैसे मिळवू शकता.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com