Career in Nursing : नर्सिंग क्षेत्रात आहे मोठा स्कोप; 12वी नंतर करिअरसाठी ठरेल सर्वोत्तम पर्याय

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । 12 वी झाल्यानंतर हेल्थ केअर (Career in Nursing) सेक्टरमधील करिअर बद्दल बोलायचे झाले तर डॉक्टरांव्यतिरिक्त तुम्ही नर्स बनूनही लोकांची चांगली सेवा करू शकता. रुग्ण आणि दुःखितांची सेवा करण्याची तुमची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी नर्सिंग हा करिअरचा सर्वोत्तम पर्याय आहे. नर्सिंग कोर्स पूर्ण केल्यानंतर इंटर्नशिप आणि ट्रेनिंगच्या मदतीने या करिअरशी संबंधित व्यावहारिक गोष्टींची चांगली माहिती मिळवता येते.
कोरोनामुळे जगभरात सर्वांनाच आरोग्याचं महत्त्वं पटत चाललं आहे. कोरोनामुळे झालेली जीवितहानी, रुग्णालयातील रुग्णांचे होणारे हाल आणि इतर सर्वच गोष्टी या कधीच विसरू न शकणाऱ्या आहेत. या काळात डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफने केलेली रुग्णांची सेवा उल्लेखनीय आहे. त्यामुळेच मेडिकल आणि नर्सिंग क्षेत्रालाआजकालच्या काळात प्रचंड स्कोप आहे. विशेष करून महिला ज्या जॉबच्या शोधात (Career in Nursing) असतील अशा महिलांसाठी नर्स म्हणून करिअरच्या संधी आहेत. जर तुम्हीही नर्स होऊ इच्छित असाल आणि याबद्दल शिक्षण कसं घ्यायचं याबद्दल संभ्रमात असाल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला नर्सिंग क्षेत्रात करिअर कसं करावं आणि त्यासाठी शिक्षण कसं घ्यावं याबद्दल माहिती देणार आहोत.

काय आहेत पात्रतेचे निकष (Career in Nursing)
1. नर्सिंग डिप्लोमामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे. तसेच 10+2 मध्ये विज्ञान शाखेत प्रवेश असावा. नर्सिंग डिप्लोमामध्ये नावनोंदणी करण्यापूर्वी, तुमच्याकडे जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरीमध्ये किमान 2 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
2. ज्यांना जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरीचा कोणताही अनुभव नाही, ते भारतीय नर्सिंग कौन्सिलमधून किमान 6 ते 9 महिने नर्सिंगमध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम करू शकतात.

इतकी असेल कॉलेजची फी
जर तुम्हाला चांगल्या मान्यताप्राप्त महाविद्यालयातून नर्सिंगमध्ये डिप्लोमा करायचा असेल तर तुम्हाला 20,000 ते 95,000 रुपयापर्यंत वार्षिक शुल्क (Career in Nursing) भरावे लागेल. डिप्लोमाचे शुल्कही कॉलेजमध्ये शिकवल्या जाणाऱ्या विषयानुसार असते.
नर्सिंग शिक्षणाचा खर्च संस्थेवर अवलंबून असतो. सरकारी आणि सरकारी अनुदानित महाविद्यालये खासगी संस्थांपेक्षा कमी शुल्क आकारतात.
BSC नर्सिंग कोर्ससाठी खासगी संस्था वार्षिक शुल्क 40 हजार ते 1 लाख 80 हजारपर्यंत आकारतात. येथे GNM कोर्सची फी 45 हजार ते 1 लाख 40 हजारपर्यंत आहे. सरकारी महाविद्यालयांमध्ये फी कमी असते.

नर्सिंग डिप्लोमानंतर इतका मिळेल पगार
1. मुख्य नर्सिंग सेवा – 4 LPA
2. नर्सिंग असिस्टंट- 2.5 LPA (Career in Nursing)
3. सामुदायिक आरोग्य परिचारिका- 3.5 LPA
4. आपत्कालीन परिचारिका – 2 LPA
5. नर्सिंग इन्चार्ज – 2 LPA
6. नर्सिंग इन्चार्ज – 3 LPA

नर्सिंगमध्ये करिअरची सुरुवात कशी करायची?
1. परिचारिका बनण्याची इच्छा असणारे लोक वेगवेगळ्या स्तरांवरून याची सुरुवात करू शकतात. यासाठी ऑक्झिलरी नर्स मिडवाइफ/हेल्थ वर्कर (एएनएम) कोर्स (नर्सिंग कोर्स) करता येईल. या पदविका अभ्यासक्रमाचा कालावधी दीड वर्षांचा असून किमान पात्रता 10वी उत्तीर्ण आहे.
2. याशिवाय तुम्ही साडेतीन वर्षांचा जनरल नर्स मिडवाइफरी (GNM) कोर्सही करू शकता. त्यासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयात 40 टक्के गुणांसह 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
3. तसेच नर्सिंगमध्ये ग्रॅज्युएशनही करता येते. यासाठी किमान पात्रता 45 टक्के गुणांसह इंग्रजी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयात बारावी उत्तीर्ण अशी आहे. यासाठी तुमचे वय किमान 17 वर्षे असणे आवश्यक आहे. (Career in Nursing)
4. नर्सिंगचे शिक्षण घेतल्यानंतर, सरकारी किंवा खासगी रुग्णालये, नर्सिंग होम, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, आरोग्य गृह, इतर विविध उद्योग आणि संरक्षण सेवांमध्ये प्रशिक्षित नर्सेससाठी मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी आहेत. त्याचबरोबर परदेशातही भारतीय परिचारिकांची मागणी वाढत आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com