Career in Medical Field : 12 वी नंतर मेडिकल क्षेत्रात करिअर करण्यासाठी ‘या’ अभ्यासक्रमांचा करा अभ्यास

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन | दरवर्षी लाखों तरुण वैद्यकीय क्षेत्रात (Career in Medical Field) नशीब आजमावण्यासाठी विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. मुलांबरोबर अनेक पालकांचेही आपल्या मुलाने वैद्यकीय क्षेत्रात करिअर करुन डॉक्टर व्हावे असे स्वप्न असते. आपल्या समाजात डॉक्टरांना देवाचा दर्जा दिला जातो. याशिवाय डॉक्टर झाल्यानंतर रुग्ण सेवेसोबतच चांगली कमाई सुध्दा करता येते. यासोबत डॉक्टर म्हणून समाजात प्रसिध्दी आणि नावलौकिक मिळतो ते वेगळंच.

तुम्ही सायन्स शाखेतून १२ वी पास असाल आणि तुम्हालाही (Career in Medical Field) मेडिकल क्षेत्रात करिअर करायचे असेल, तर बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही एमबीबीएस (MBBS) बीडीएस (BDS) बीएस्सी नर्सिंग (B.Sc. Nursing) बीफार्मा (B.Pharma) अशा विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकता. आज आपण इथे या अभ्यासक्रमाविषयी जाणून घेणार आहोत.

1. एमबीबीएस (MBBS)
भारतात एमबीबीएस डॉक्टरला वैद्यकीय क्षेत्रात सर्वोच्च दर्जा मिळतो. 12 वी पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्ही एमबीबीएस अर्थात बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरीमध्ये (Career in Medical Field) प्रवेश घेऊ शकता. हा पाच वर्षांचा अभ्यासक्रम आहे. यामध्ये चार वर्षांचा अभ्यास आणि एक वर्षाची इंटर्नशिप असते. एमबीबीएसमध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला NEET (NEET) परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल.

2. बी. एस्सी. नर्सिंग (B.Sc. Nursing)
जर तुम्ही NEET परीक्षा पास करू शकला नाही तर B.Sc नर्सिंग हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये तुम्ही नर्सिंग संबंधित अभ्यास शिकू शकता.

3. बीडीएस (BDS) (Career in Medical Field)
मेडिकल क्षेत्रात शिक्षण घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एमबीबीएसशिवाय बीडीएस सुध्दा चांगला पर्याय मानला जातो. यामध्ये दातांचा डॉक्टर बनण्यासाठीचा अभ्यासक्रम शिकवला जातो. बीडीएसला बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी (Bachelor of Dental Surgery) म्हणून ओळखले जाते. बीडीएसमध्ये प्रवेश घेण्यासाठी नीट परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
या सर्व अभ्यासक्रमासह वैद्यकीय क्षेत्रात अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत, ज्यामध्ये तुम्ही 12 वी पूर्ण केल्यानंतरच प्रवेश घेऊ शकता. यामध्ये B.Pharm आणि नंतर D.Pharm, BAMS, BUMS BTP सारख्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन वैद्यकीय क्षेत्रात आयुष्यभरासाठी करिअर करता येते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com