Career in IT : दिवसेंदिवस प्रगती करणाऱ्या IT क्षेत्रात घडू शकतं उत्तम करिअर,‌ कोणता आणि कुठे कोर्स कराल?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । IT म्हणजेच Information technology, हे क्षेत्र (Career in IT) दिवसेंदिवस वाढत आहे. विदेशात जाऊन करिअर घडवू पाहणाऱ्यांसाठी ही मोलाची संधी म्हणावी लागेल. IT सेक्टर मध्ये काम करणाऱ्या लोकांचा औरा काही वेगळाच असतो. हे एक नामांकित क्षेत्र आहे. तसं पहायला गेल्यास अनेकांना या क्षेत्राबद्दल आकर्षण आहे, कारण इथे मिळणारा पैसा अफाट असतो. पण ह्यासाठी कंपनी तुमच्याकडून भरपूर प्रमाणात काम करून घेत असते. जर का तुम्ही एका चांगल्या संधीच्या शोधात आहात, आणि कितीही कष्ट करण्याची तुमची तयारी असेल तर हे क्षेत्र तुमच्यासाठी आहे. दिवसेंदिवस अनेक मुलं आपली स्वप्नं घेऊन या क्षेत्रात येत असतात. तर काय आहेत इथल्या उपलब्ध संधी? जाणून घेण्यासाठी नक्की वाचा…

12वी नंतर IT चा कोर्स कसा करावा?
बारावी झालेल्या मुलांना डिग्री आणि डिप्लोमा दोन्हींद्वारे हा कोर्स करता येतो. हा कोर्स केल्यानंतर सरकारी तसेच खासगी कंपनीमध्ये तुम्ही नोकरी मिळवू शकता. इथे प्रवेश मिळवू पाहणाऱ्या मुलांना कमीत कमी 50% गुण मिळवणे गरजेचे आहे. याशिवाय कॉलेज कडून घेतली जाणारी प्रवेश परीक्षा (Career in IT) उत्तीर्ण करणं भाग असतं. MET, BISAT, JEE ह्या सारख्या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करून तुम्ही प्रवेश मिळवू शकता. परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर तुम्हाला B. Tech, Bsc IT, BCA, Diploma in Information technology, Certificate Course in Computer Application/Networking मध्ये प्रवेश मिळवता येतो.

कुठली कॉलेजेस देतात IT चा कोर्स?
1. Army Institute of Technolgy, Pune
2. National Institute of Technology, Karnataka
3 Vellore Institute of Technology, Vellore
4. Motilal Institute of Technology, Alahabad

IT चा कोर्स केल्यानंतर काय काम कराल?
1. डेटा साईनटिस्ट (Data Scientist)
2. डेटा इंजिनीअर (Data Engineer)
3. बिझनेस एनालीस्ट इंजिनअर (Business Analyst Engineer)
4. फुल स्टेक डेव्हलपर (Full Stack Developer)
5. मोबाईल ऍप डेव्हलपर (Mobile App Developer)
6. वेब डेव्हलपर (Web Developer)

काय असते ह्या कोर्सची फी? (Career in IT)
हा कोर्स करण्यासाठी तुमच्याकडून साधारण 1,20,000 किंवा त्यापेक्षा जास्त फीस आकारल्या जातील. प्रत्येक कॉलेज प्रमाणे ह्या फी बदलत असतात.
या कोर्स नंतर किती पैसे कमवू शकता?
IT क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दरमहा 40 हजार पर्यंत पगार दिला जातो. सध्या पुणे, बेंगळूरू, चेन्नई ह्या राज्यांमध्ये IT क्षेत्राची वाढ होत आहे. इथे काम करण्यासाठी तुम्हाला Cloud Computing, Programming, Computer Science and Programming यासारख्या स्किल्सची भरपूर गरज असते. यानंतर इन्फोसिस, टेक महिंद्रा, माइक्रोसॉफ्ट, विप्रो यांसारख्या मोठाल्या कंपन्यांध्ये काम (Career in IT) करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते, शिवाय सरकारी कार्यालयांमध्ये तुम्ही तुमचं नशिब आजमावून पाहू शकता. या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध असल्या तरीदेखील या स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी तुम्हाला परिश्रम करण्याची तयारी ठेवावी लागते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com