करिअरनामा ऑनलाईन । देशात वाढत्या जागरूकतेमुळे (Career in Insurance Sector) आयुर्विमा आणि जनरल इन्शुरन्सचा व्यवसायही झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत या क्षेत्रात विविध स्तरांवर कुशल तरुणांना रोजगार मिळण्याच्या शक्यताही सातत्याने वाढत आहेत. जागतिक महामारीनंतर विम्याचे महत्त्व आणि त्याची गरज पूर्वीपेक्षा अधिक वाढली आहे. आयुष्याच्या बाबतीतील अनिश्चिततेमुळे या वातावरणात प्रत्येकाला आपल्या भविष्याच्या सुरक्षिततेबद्दल खात्री हवी असते. विमा क्षेत्राचे डिजिटायझेशन आणि त्यात तंत्रज्ञानाचा समावेश केल्यानेही अनेक आमूलाग्र बदल घडून आले आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ब्लॉकचेन आणि इंटरनेट ऑफ थिंग्जने विमा कंपन्यांचे संपूर्ण कामकाजच बदलून टाकले आहे. यामुळे या क्षेत्रातील तरुणांसाठी करिअरची नवी दारे खुली झाली आहेत.
विमा आज प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. या क्षेत्राची व्याख्या करायची झाली, तर आपल्याला होणाऱ्या नुकसानीची भरपाई. चोरी, अपघात, आग किंवा (Career in Insurance Sector) तत्सम प्रसंगामुळे झालेलं नुकसान भरुन काढण्यासाठी दोन पक्षांमध्ये झालेल्या करारानुसार विशिष्ट रक्कम दिली जाते. हा करार विमा कंपनी आणि व्यक्ती/संस्था/संघटना यांच्यामधे झालेला असतो. विमा स्वीकारणारी व्यक्ती (इन्शुरर) आणि विमाधारक (इन्शुअर्ड) यांच्यादरम्यानचा हा करार असतो.
असे आहेत इन्शुरन्सचे प्रकार –
1. Life (जीवन विमा)
2. Health (आरोग्य विमा)
3. Goods (वस्तूंचा विमा)
4. Equipments (उपकरणांचा विमा)
5. Building (इमारतींचा विमा)
6. Business (व्यवसाय विमा)
7. Travel (प्रवास विमा)
हे असतं महत्वाचं काम – (Career in Insurance Sector)
एखाद्या व्यक्तीसाठी किंवा संस्थेसाठी मौल्यवान असणाऱ्या कोणत्याही वस्तूचा (मात्र, त्या वस्तूचा कव्हरेजमध्ये समावेश होत असल्यास) विमा क्षेत्रात अॅक्चुरिअल्सचा समावेश होतो. कोणताही विमा उतरवताना इन्शुरन्स रिस्क (विम्याची जोखीम), प्रीमिअम (हप्ता) आणि पेन्शन (निवृत्ती वेतन) प्लॅन यांची आकडेमोड करण्याचं काम अॅक्चुरिअल सायन्समध्ये (विमा गणितशास्त्र विज्ञान) केलं जातं. कोणतीही पॉलिसी काढताना या महत्त्वाच्या गोष्टी असतात. भविष्यातील आकस्मिक आर्थिक आणि आर्थिक प्रभाव पाडू शकणाऱ्या सांख्यिकी मूल्यांकनावर हे आधारित आहे.
इन्शुरन्स क्षेत्रात पुढील पदावर करता येतं काम –
1. इन्शुरन्स एजंट
2. इन्शुरन्स अंडररायटर
3. इन्शुरन्स सर्व्हेअर
4. अॅक्चुअरी (Career in Insurance Sector)
5. अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर
6. अकाउंट्स अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर
7. डेव्हलपमेंट ऑफिसर
काय आहे पात्रता –
इन्शुरन्स आणि अॅक्चुरिअल्स क्षेत्रात करिअर करायचं, तर बारावीनंतर किंवा ग्रॅज्युएशननंतर एखाद्या कोर्सला प्रवेश घेता येईल. इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीचे (आयआरडीए) अधिकृत पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रम काही संस्थांमध्ये उपलब्ध आहेत. यासाठी बॅचलर डिग्री पास असणं आवश्यक आहे तसेच, इन्शुरन्स क्षेत्रातील कामाचा दोन वर्षांचा अनुभव गाठीशी असायला हवा. बहुतांशी विमा कंपन्या भरतीच्या वेळी कर्मचाऱ्यांना कामाचं प्रशिक्षण देतात.
इथे करु शकता कोर्स –
1. मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये बीकॉम इन बँकिंग अँड इन्शुरन्स कोर्स उपलब्ध आहे. युनिव्हर्सिटीशी संलग्न असणाऱ्या कॉलेजांमध्ये हा कोर्स उपलब्ध (Career in Insurance Sector) आहे. तसेच पुढील काही संस्थांमध्येही हा कोर्स उपलब्ध आहे त्याविषयी जाणून घेवूया…
2. अॅक्चुरिअल सोसायटी ऑफ इंडिया,
Official Website – www.actuariesindia.org
3. इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया,
Official Website – www.insuranceinstituteofindia.com
4. द इन्स्टिट्यूट ऑफ इन्शुरन्स सर्व्हेअर्स अँड अॅडजस्टर्स,
Official Website – www.iisaindia.com
इथे आहेत कामाच्या संधी –
1. इन्शुरन्स कंपन्या (सार्वजनिक किंवा खाजगी, लाइफ किंवा जनरल)
2. बँका तसेच, वर्ल्ड बँक, एडीबी यांच्यासारख्या इन्व्हेस्टमेंट फर्म्स अॅक्चुरिअल बीपीओ कंपनी
3. पेन्शन बँका आणि एम्प्लॉयी बेनिफिट कंपन्या
4. अॅसेट लायबिलिटी मॅनेजमेंट कंपनी (Career in Insurance Sector)
5. आयआरडीए, पीएफआरडीए आणि टीएसी यांच्यासारख्या अॅथॉरिटीज
6. फायनान्स आणि लीझिंग फर्म्स
7. कन्सल्टन्सी फर्म्स / अॅक्च्युरीज फर्म्स
8. इन्व्हेस्टमेंट आणि फायनान्शिअल सर्व्हिसेस
9. मोठ्या भांडवल (कॅपिटल) आणि मोठे प्रकल्प हाताळणाऱ्या कंपन्या
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com