Career In Fitness Training : Fitness Trainer बनण्यासाठी ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात; कोर्सपासून पगारापर्यंत वाचा संपूर्ण माहिती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । कोरोनाकाळात सर्वांचाच स्वतःच्या तब्येतीची (Career In Fitness Training) काळजी घेण्याकडे कल वाढू लागला आहे.  अनेकांनी फिटनेसकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. फिटनेस राखण्यासाठी लोकं जिममध्ये जावून वर्कआऊट करण्यास प्राधान्य देतात. तर काहीजण योगासने करण्यास पसंती देतात. पण असे बरेच  लोक आहेत ज्यांना नक्की व्यायाम कसा करावा? कशा पद्धतीनं योग करावा? फिट कसं राहावं? हे अजूनही माहिती नाही. तुमच्याकडे या सर्व प्रश्नांची उत्तरं असतील तर तुम्ही एक चांगले ‘फिटनेस ट्रेनर’ बनू शकता. फिटनेस ट्रेनर नक्की कसं व्हावं याविषयी आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
फिटनेस क्षेत्रात नोकरीच्या संधी वाढत आहेत. विशेष म्हणजे तरुण आणि वृद्ध लोकही फिटनेस ट्रेनर बनण्याच्या दिशेने पावले टाकत आहेत. आगामी काळात फिटनेस ट्रेनिंग इंडस्ट्रीत मोठी तेजी पाहायला मिळू शकते, असे मानले जात आहे. शरीर कमाविण्यासोबत निरोगी जीवनशैलीची गरज (Career In Fitness Training) वाढत आहे. प्रमाणित फिटनेस ट्रेनरसाठी (Certified Fitness Trainer) बाजारात नोकरीच्या मोठ्या संधी आहेत.

Career In Fitness Training

फिटनेस ट्रेनर बनण्यासाठी ‘या’ गोष्टी माहित हव्यात
एक यशस्वी फिटनेस ट्रेनर बनण्यासाठी तुमच्याकडे असलेले सर्वात महत्त्वाचे कौशल्य म्हणजे तुम्हाला लोकांच्या विविध प्रकारच्या जीवनशैली, विविध प्रकारचे आहार आणि मानवी शरीर कसे कार्य करते याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. फिटनेस ट्रेनर उत्साही असावा आणि त्याच्याकडे भरपूर (Career In Fitness Training) तग धरण्याची क्षमता असावी. तसेच व्यायामाची विविध साधने व उपकरणे कशी वापरावीत याचे ज्ञान त्यांना असणं आवश्यक आहे.
काय असतं फिटनेस ट्रेनरचं काम?
फिटनेस ट्रेनर लोकांना चांगले शारीरिक आरोग्य मिळवून देण्यास आणि ते मेंटेन करण्यास मदत करतो. ट्रेनर नेहमी त्यांच्या क्लायंटला व्यायाम किती आणि कसा करावा, त्याची दिनचर्या कशी असावी, आहार कोणता घ्यावा, शरीराला आवश्यक पोषण घटक कसे मिळवावे या आणि अशा महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सल्ला देते.

Career In Fitness Training

फिटनेस ट्रेनरचे प्रकार (Career In Fitness Training)
फिटनेस ट्रेनर एकतर जिममध्ये व्यायाम घेतात किंवा केवळ त्यांच्या ग्राहकांच्या घरी जावून त्यांना फिटनेस ट्रेनिंग देतात. फिटनेस प्रशिक्षकांचे अनेक प्रकार आहेत; फ्रीलांसर, वैयक्तिक प्रशिक्षक किंवा प्रशिक्षक जे पगारासाठी जिम, हॉटेल किंवा क्लबमध्ये काम करतात. फिटनेस ट्रेनर ग्रुप क्लास देखील घेतात तसेच क्लायंटला वैयक्तिकरित्या ट्रेनिंग देतात.
किती मिळतो पगार
फिटनेस ट्रेनरचा पगार हा त्या व्यक्तीच्या कामाच्या पद्धतीवर अवलंबून आहे. ती व्यक्ती स्वत: काम करते की जिममध्ये काम करते यावर तिची कमाई अवलंबून असते. तुम्ही या व्यवसायात दरमहा 50,000 ते 1,24,000 पर्यंत कमवू शकता.

Career In Fitness Training

एक सर्टिफाईड फिटनेस ट्रेनर कसे बनायचे? फिटनेस ट्रेनर होण्यासाठी तुमच्यात कोणते गुण असले पाहिजेत? याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.

1. ही कौशल्ये विकसित करा
फिटनेसच्या क्षेत्रात करिअर करणे सोपे नाही. जर तुम्हाला या उद्योगात प्रवेश करायचा असेल, तर तुम्ही फिटनेस फ्रीक असले पाहिजे. इतरांनाही फिटनेस मिळवण्यात (Career In Fitness Training) मदत करण्यासाठी वचनबद्ध असले पाहिजे. फिटनेस ट्रेनर व्यक्तींना योग्य फिटनेस प्रोग्राम फॉलो करण्यास प्रवृत्त करतात. त्यामुळे स्वत:ला तंदुरुस्त ठेवणे फार महत्वाचे आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी संवाद साधण्यासाठी फिटनेस ट्रेनरकडे चांगले संवाद कौशल्य आवश्यक असणे गरजेचे आहे.
2. सर्टिफाइड अभ्यासक्रमात प्रवेश घ्या
फिटनेस क्षेत्रात येण्यासाठी मान्यताप्राप्त संस्थेकडून प्रमाणपत्र मिळणं अत्यंत आवश्यक आहे. अनेक संस्था लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षांसह विविध प्रकारचे फिटनेस प्रशिक्षण अभ्यासक्रम देतात. 10 हजार ते 30 हजारच्या दरम्यान फीसह या प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा कालावधी 2 ते 3 महिन्यांचा (Career In Fitness Training) असू शकतो. बहुतेक प्रमाणपत्रे 2-3 वर्षांत कालबाह्य होतात यासाठी त्यांचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. कोर्स पूर्ण केल्यानंतर, एक जिम ट्रेनर रु. 15000 ते रु. 30000 पर्यंत कमवू शकतो.

Career In Fitness Training

3. स्पेशालिस्ट सर्टिफिकेशन गरजेचे (Career In Fitness Training)
तुम्ही फिटनेस प्रशिक्षणाच्या क्षेत्रात स्वत:चे स्पेशलायझेशन करु शकता. तसेच प्रमाणपत्र देखील मिळवू शकता. जर तुम्हाला वेट लिफ्टिंगमध्ये रस असेल तर त्यातही सर्टिफिकेट कोर्स करता येईल.
4. अनुभव महत्वाचा
जर तुम्हाला प्रमाणित फिटनेस ट्रेनर बनायचे असेल तर तुम्हाला कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. बहुतेक फिटनेस प्रशिक्षकांना त्यांच्या अनुभवामुळे यश मिळते. व्यावसायिक अनुभव मिळविण्यासाठी आणि बरेच काही शिकण्यासाठी फ्रेशर्स उमेदवार हे फिटनेस ट्रेनरच्या अंतर्गत सहाय्यक म्हणून देखील काम करू शकतात.

Career In Fitness Training

5. स्वतःचा फिटनेस व्यवसाय करता येईल
ज्यांना चांगल्या फिटनेससह उत्साही रहायचे आहे त्यांच्यासाठी तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते. यामध्ये तुम्ही सर्वसामान्य माणसांपासून (Career In Fitness Training) ते सेलिब्रेटी, खेळाडू, बिझनेसमन, मॉडेल, डॉक्टर, इंजिनीअर, नोकरदार, गृहिणी, ज्येष्ठ नागरिक यांना तुम्ही तुमचे स्वतःचे क्लायंट बनवून फिटनेस ट्रेनिंग देवून चांगली कमाई करू शकता.
जिम ट्रेनरसाठी देशातील सर्वोत्तम संस्था –
1. इंदिरा गांधी शिक्षण आणि क्रीडा विज्ञान संस्था, दिल्ली
2. लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन
3. साई,एनएस साउथ सेंटर, युनिव्हर्सिटी, बंगलोर
4. साई, एनएस ईस्टन सेंटर, सॉल्ट लेक सिटी, कोलकाता
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com