Career In Architecture : आर्किटेक्ट व्हायचंय!! शिक्षणाची अट काय? कुठे मिळेल संधी? पगार किती मिळतो? इथे मिळेल संपूर्ण माहिती…

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । दहावी बारावी झाल्यानंतर (Career In Architecture) पुढे काय ? हा प्रश्न अनेक तरुणांना पडतो. अनेकजणांना मेडिकल आणि इंजिनियरिंगमध्ये करिअर करायची इच्छा नसते. हे विद्यार्थी करिअरची वेगळी वाट शोधत असतात. यासाठी आज आम्ही तुम्हाला आर्किटेक्चरमधील करिअरच्या संधी विषयी सांगणार आहोत.
आर्किटेक्चर हा करिअरच्या अनेक चांगल्या पर्यायांपैकी एक पर्याय आहे. इमारतींचे डिझाईन, नियोजन आणि बांधकाम करणे याला आर्किटेक्चर म्हणतात.

काय असतं आर्किटेक्चरचं काम
1. प्रथम कोणत्याही संरचनेचा आराखडा तयार करणे आणि नंतर त्याची रचना तयार करणे त्या नंतर ते बांधकाम करणे.
2. कोणतीही वास्तू बनवण्यापूर्वी त्याची पूर्ण तयारी करावी लागते, जी वास्तुशास्त्राने केली जाते.
3. ही वास्तू कशी बांधली जाईल आणि ती कशी असेल हे आर्किटेक्चर सांगतात.
4. आर्किटेक्चरला आधी इमारतीच्या सर्व गोष्टी (Career In Architecture) माहीत असतात, मग त्याचा आराखडा बनवला जातो, आराखडा बनवल्यानंतरच पुढे इमारतीचे काम सुरू केले जाते.
5. आर्किटेक्चर विविध प्रकारचे डिझाइन तयार करण्यात माहिर असतात.

कोणता कोर्स कराल
1. आर्किटेक्चर होण्यासाठी तुम्ही गणित आणि इंग्रजी विषयात बारावी उत्तीर्ण असणे तसेच इंग्रजी आणि गणित या दोन्ही विषयांत किमान 50% गुणांसह उत्तीर्ण असले पाहिजे.
2. जर तुम्ही 10वी नंतर डिप्लोमा कोर्स केला असेल, तर तुम्ही आर्किटेक्चरची पदवी घेऊ शकता, त्यासाठी तुम्हाला 12वी उत्तीर्ण होण्याचीही गरज नाही.
3. आर्किटेक्चरची होण्यासाठी तुम्ही 10वीनंतर आर्किटेक्टकमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा कोर्स करू शकता. त्याचबरोबर 12 वी नंतर बॅचलर ऑफ आर्किटेक्चर, मास्टर ऑफ आर्किटेक्चर आणि पीएचडी देखील करता येते.
हे सॉफ्टवेअर शिकावे लागतात (Career In Architecture)
1. आर्किटेक्टला केवळ ही पदवी मिळवून पूर्ण काम मिळत नाही, त्यांना ऑटोकॅड किंवा असे काही सॉफ्टवेअर शिकावे लागते ज्यामध्ये हे लोक आर्किटेक्टक डिझाइन तयार करतात आणि या माध्यमातून ते इमारत डिझाइन करू शकतात.
2. सॉफ्टवेअरमध्ये काम करण्यासाठी, तुमच्यासाठी स्केचअप, रेविट, 3डी स्टुडिओ मॅक्स, ऑटोकॅड, व्ही-रे फोटोशॉप आणि हँड ड्रॉइंग जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.

आर्किटेक्टमध्ये करिअरच्या संधी
1. आर्किटेक्चर म्हणून तुम्ही खाजगी, सार्वजनिक आणि सरकारी कोणत्याही क्षेत्रात तुमचे करिअर करू शकता. सार्वजनिक क्षेत्राबद्दल बोलायचे झाले तर सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, आरोग्य यांसारख्या विभागांमध्ये आर्किटेक्चरांची मागणी कायम आहे.
2. तसेच सरकारी क्षेत्रात, तुम्ही पुरातत्व विभाग, संरक्षण मंत्रालय, रेल्वे, स्थानिक एजन्सी, राज्य विभाग, गृहनिर्माण येथे नोकऱ्या शोधू शकता. तुम्हाला काही वर्षांचा (Career In Architecture) अनुभव मिळाल्यास, तुम्ही सल्लागार आणि कन्स्ट्रक्टर म्हणून तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. बांधकाम क्षेत्रातील मोठ्या गुंतवणुकीमुळे वास्तुकलाची मागणी सातत्याने वाढत आहे. तज्ञांच्या मते, भारतातील वास्तुकलाची मागणी आणि पुरवठा यामध्ये अजूनही मोठी तफावत असल्याचे दिसून येते.
किती मिळू शकतो पगार
1. आर्किटेक्चर म्हणून काम करताना संस्थेच्या आकारावर आणि तुमच्या अनुभवावर पगार अवलंबून असतो.
दोन ते चार वर्षांच्या अनुभवानंतर, तुमचा मासिक पगार 50,000 रुपयांपेक्षा जास्त होऊ शकतो. दुसरीकडे सरकारी क्षेत्रातील वेतनश्रेणीनुसार तुम्हाला लाखात पगार मिळू शकतो.
2. आर्किटेक्चरमधल्या करिअरमध्ये मोठ्या कमाईची क्षमता आहे. विशेषत: ज्यांच्याकडे यशस्वी प्रकल्पांचा मजबूत पोर्टफोलिओ आहे, उच्च-गुणवत्तेचं (Career In Architecture) काम वितरीत केल्याची ओळख आहे आणि व्यवसाय वाढवण्याची क्षमता आहे, ते या क्षेत्रात भरपूर कमाई करू शकतात. आर्किटेक्ट्सना चांगला पगार मिळतो. भारतातल्या आर्किटेक्ट्सना सरासरी 9 लाख 50 हजार रुपये वार्षिक पगार मिळत आहे. हे आकडे अनुभव, ठिकाण आणि नियोक्त्याच्या प्रकारानुसार बदलू देखील शकतात.

करिअरमध्ये लवचिकता
लवचिकता हा या क्षेत्रात करिअर करण्याचा एक मोठा फायदा आहे. आर्क्टिटेक्टकडे आर्किटेक्चर फर्म, सरकारी एजन्सी, ना-नफा संस्था किंवा सेल्फ-एम्प्लॉइड (Career In Architecture) कन्सल्टंट म्हणून काम करण्यासारखे विविध प्रकारचे पर्याय आहेत. यामुळे आर्क्टिटेक्ट्सना आपली आवड, कौशल्यं आणि इतर उद्दिष्टांसाठी सर्वोत्तम पर्याय निवडण्याची संधी मिळते.
आर्किटेक्चर कोर्स करण्यासाठी देशातील इन्स्टिट्यूट
1.स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर, नवी दिल्ली
2. IIT खरगपूर (IIT खरगपूर)
3. IIT रुड़की (IIT रुड़की)
4. सर जेजे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (Career In Architecture)
5. NIT, तिरुचिरापल्ली (NIT, तिरुचिरापल्ली)
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com